Shah Rukh Khan movie: २००७ साली बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर ७८.२५ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर १४८.२० कोटी रुपयांची कमाई केली होती. या सिनेमाचं नाव ओळखलंत का? नाही! या चित्रपटात २३ कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली होती. तर ४८ कलाकारांनी कॅमिओ केला होता. आता तरी तुम्हाला चित्रपटाचे नाव आठवले का?
चित्रपटाचे नाव सांगण्यापूर्वी आम्ही तुम्हाला आणखी एक हिंट देणार आहोत. या चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत होती. हो! 'ओम शांती ओम' असं या सिनेमाचं नाव आहे. या चित्रपटाची कथा फराह खानने लिहिली होती आणि या चित्रपटाचे दिग्दर्शनही फराह खाननेच केले होते. या चित्रपटाच्या निर्मितीवेळी फराह खान गरोदर होती.
फराह खानने या चित्रपटाचा उल्लेख एका मुलाखतीमध्ये केला होता. या मुलाखतीमध्ये तिने सांगितले की, अमिताभ बच्चन आणि आमीर खान यांना चित्रपटाच्या 'दिवांगी-दिवांगी' या गाण्यात समाविष्ट करायचे होते पण तसे होऊ शकले नाही. मनीष पॉलच्या पॉडकास्ट शोमध्ये फराह म्हणाली, "अमितजी येऊ शकले नाहीत कारण त्या आठवड्यात ऐश्वर्या आणि अभिषेकचे लग्न झाले होते. त्याचवेळी आमिर बराच वेळ मला टाळत राहिला आणि मग शेवटी त्याने अतिशय गमतीशीर कारण देत येण्यास नकार दिला. आमिरने मला सांगितले की, तो 'तारे जमीं पर'चे एडिटिंग करत आहे. मी म्हणालो, 'मला फक्त दोन तास दे'. यावर आमिरने उत्तर दिले की, फराह, जर मी दोन तास एडिटिंग सोडले तर माझा चित्रपट सहा महिने लांबणीवर पडेल. नंतर मी त्याला खरे कारण विचारले असता तो म्हणाला की त्याला यायचे नाही. "
वाचा: भाजपच्या 'या' माजी महिला खासदाराने साकारली होती अशोक सराफ यांच्या मुलीची भूमिका
गेल्या वर्षी शाहरुखचे एकापाठोपाठ एक असे तीन सिनेमे प्रदर्शित झाले. त्याच्या तीनही सिनेमांना चांगला प्रतिसाद मिळाला. येत्या काळात शाहरुखचा किंग हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तसेच त्याच्या पठाण या चित्रपटाचा पुढचा भाग देखील येणार असल्याचे म्हटले जात आहेत. शाहरुख सलमान खानसोबत देखील काम करणार आहे. टायगर वर्सेस पठाण हा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात आहे. शाहरुखचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पुाहात असल्याचे बोलले जात आहे.
संबंधित बातम्या