मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shah Rukh Khan: ‘किंग खान’ने पूर्ण केली कॅन्सरग्रस्त चाहतीची इच्छा! व्हिडीओ कॉल केला अन्…

Shah Rukh Khan: ‘किंग खान’ने पूर्ण केली कॅन्सरग्रस्त चाहतीची इच्छा! व्हिडीओ कॉल केला अन्…

May 24, 2023 07:57 AM IST

Shah Rukh Khan Cancer Patient Fan: शिवानी चक्रवर्ती नावाच्या ६० वर्षीय महिलेने शाहरुख खानला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिची ही इच्छा शाहरुख खानने पूर्ण केली आहे.

Shah Rukh Khan Cancer Patient Fan
Shah Rukh Khan Cancer Patient Fan

Shah Rukh Khan Cancer Patient Fan: शाहरुख खान बॉलिवूडचा असा अभिनेता आहे, ज्याचे चाहते जगभरात पसरलेले आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. नुकतीच पश्चिम बंगालमधील शिवानी चक्रवर्ती नावाच्या ६० वर्षीय महिलेने शाहरुख खानला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिची ही इच्छा शाहरुख खानने पूर्ण केली आहे. शिवानी ही कॅन्सरग्रस्त रुग्ण असून, तिचा कर्करोग शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. ती शाहरुखची खूप मोठी फॅन आहे. तिने किंग खानचे सर्व चित्रपट पाहिले आहेत. इतकेच नाही तर, तिने आपल्या घरात शाहरुख खानच्या चित्रपटांचे पोस्टरही लावले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजमध्ये असल्याने तिच्याकडे आता फारसा वेळ नसल्याचे समजल्यावर तिने एकदा शाहरुखला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. तर, किंग खानने देखील आपल्या या चाहतीची इच्छा पूर्ण केल्याची माहिती समोर येत आहे. त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नसली, तरी व्हिडीओ कॉलवर बोलणे झाले आहे.

Vaibhavi Upadhyaya: ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू; गाडी कोसळली दरीत!

शाहरुख खानला या चाहतीच्या तब्येतीबद्दल कळताच तिने व्हिडीओ कॉल केला आणि तिच्याशी ४० मिनिटे गप्पा मारल्या. विशेष म्हणजे यावेळी शिवानीने तिची इच्छा व्यक्त केली की, तिला शाहरुखला स्वतःच्या हाताने बनवलेले बंगाली खाद्यपदार्थ खायला द्यायचे आहेत. तिच्याशी बोलताना शाहरुखने तिच्या हातचे मासे आणि तिने घरी बनवलेले साधे जेवण खायला नक्की येईन, असे वचन दिले.

मीडिया रिपोर्टनुसार, शिवानीच्या मुलीने सांगितले की, शाहरुखने व्हिडीओ कॉलवर तिच्या आईच्या तब्येतीसाठी प्रार्थना केली. तसेच, तिला लवकरात लवकर बरे वाटावे, म्हणून शुभेच्छा देखील दिल्या. इतकेच नाही तर, शाहरुखने आपल्या चाहत्याला वचन दिले की, तो तिच्या मुलीच्या लग्नात येईल आणि तिथे मासे व जेवणावर ताव मारेल. शाहरुख खानच्या एका फॅन पेजने ट्विटरवर एक फोटोही शेअर केला आहे, जो या व्हिडीओ कॉल दरम्यानचा असल्याचे सांगण्यात येत आहे. शाहरुख खानने आपल्या औटघटका मोजणाऱ्या चाहतीशी संवाद साधल्याची ही बातमी सोशल मीडियावर येताच चाहते किंग खानचे तोंड भरून कौतुक करत आहेत. किंग खानची ही शैली त्याच्या चाहत्यांना खूप आवडली आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग