Shah Rukh Khan Luxurious Look: बॉलिवूड किंग शाहरुख खान सध्या त्याच्या 'डंकी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान अभिनेता आता शाहरुख खान चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरुख खान नुकताच दुबईमध्ये पोहोचला होता. यावेळी शाहरुख खानच्या लूकने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. शाहरुख खानच्या या लूकची भरपूर चर्चा रंगली होती. दुबईच्या या इव्हेंटमध्ये शाहरुखने अतिशय लक्झरी गोष्टी परिधान केल्या होत्या. या लूकमध्ये त्याने ५१ लाखांचं घड्याळ आणि ५ लाखांचं जॅकेट परिधान केलं होतं. शाहरुख खानने परिधान केलेल्या इतर गोष्टींच्याही किंमती समोर आल्या आहेत.
ऑनस्क्रीनच नव्हे तर, ऑफस्क्रीन देखील शाहरुख खान चाहत्यांची मनं जिंकून घेतो. शाहरुख खानचा हाच क्लासिक अंदाज त्याच्या चाहत्यांना खूप आवडतो. शाहरुख खानच्या दुबई इव्हेंटमधला लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ग्रे जॅकेट, निळा शर्ट आणि गॉगल या लूकमध्ये शाहरुख खान खूपच डॅशिंग दिसत होता. शाहरुख खानच्या गॉगलची किंमत ३१५०० रुपये आहे. त्याच्या या जॅकेटची किंमत ४,९८,००० लाख रुपये, ५१.४८ लाखांचं घड्याळ, १.६ लाखांची पँट आणि ७० हजारांवर बूट परिधान केले होते. अर्थातच शाहरुख खानच्या या लूकची एकूण किंमत ५८ लाख रुपये होती. शाहरुख खानच्या या लूकच्या किंमतीत तुम्ही एखादं आलिशान घर खरेदी करू शकता.
शाहरुख खानसाठी यंदाचं वर्ष फारच छान गेलं आहे. या वर्षात रिलीज झालेले शाहरुख खानचे तीनही चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. या वर्षाची सुरुवात शाहरुख खानच्या 'पठान'पासून झाली होती. तर, या वर्षाचा शेवट देखील शाहरुख खानच्या 'डंकी' या चित्रपटाने होणार आहे. नुकताच शाहरुखचा 'डंकी' हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तीन दिवसांत हा चित्रपट १०० कोटींच्या जवळ पोहोचला आहे. या आधी रिलीज झालेल्या 'पठान' आणि 'जवान'ला देखील प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड सेट केले होते.
संबंधित बातम्या