'दिलवाले दुल्हनिया'साठी शाहरुख खान नव्हता पहिली पसंती! 'या' अभिनेत्याला मिळणार होती संधी
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'दिलवाले दुल्हनिया'साठी शाहरुख खान नव्हता पहिली पसंती! 'या' अभिनेत्याला मिळणार होती संधी

'दिलवाले दुल्हनिया'साठी शाहरुख खान नव्हता पहिली पसंती! 'या' अभिनेत्याला मिळणार होती संधी

Dec 05, 2024 03:42 PM IST

Bollywood Kissa : ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटात शाहरुख आणि काजोलव्यतिरिक्त अनुपम खेर, अमरीश पुरी, मंदिरा बेदी आणि इतर कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. चित्रपटाची कथाच नाही तर त्यातील सर्व गाणीही सुपरहिट ठरली आहेत.

दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे
दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (instagram)

Bollywood Intresting Kissa In Marathi : बॉलिवूडचे असे अनेक आयकॉनिक सिनेमे आहेत, जे आजही प्रेक्षकांना खूप आवडतात. असाच एक चित्रपट म्हणजे 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'. हा चित्रपट १९९५ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शाहरुख खान आणि काजोलच्या रोमँटिक जोडीने पडद्यावर आग लावली होती. या चित्रपटात शाहरुख आणि काजोलव्यतिरिक्त अनुपम खेर, अमरीश पुरी, मंदिरा बेदी यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाची कथाच नाही, तर त्यातील सर्व गाणीही सुपरहिट ठरली आहेत. ही गाणी आजही मोठ्या आवडीने ऐकली जातात. पण तुम्हाला माहित आहे का की 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'मधून इतिहास घडवणारा शाहरुख खान या चित्रपटासाठी आदित्य चोप्राची पहिली पसंती नव्हता. त्याला या शाहरुखऐवजी सैफ अली खान आणि एका हॉलिवूड अभिनेत्याला पाहायचे होते. तो अभिनेता कोण आहे माहीत आहे का?

शाहरुख खान नव्हे, ‘या’ अभिनेत्याला होती पहिली पसंती!

'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'मध्ये शाहरुख खानच्या आधी सैफ अली खान आणि हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझ यांना राजच्या भूमिकेसाठी पसंती देण्यात आली होती. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांना आपला चित्रपट इंडो-अमेरिकन प्रोजेक्ट म्हणून बनवायचा होता. याच कारणामुळे त्याला टॉम क्रूझचाही चित्रपटात समावेश करायचा होता. पण आदित्यचे वडील यश चोप्रा यांना आपल्या मुलाची ही कल्पना अजिबात आवडली नाही.  या गोष्टीला मान्यता देण्यास नकार दिला. यानंतर पुन्हा एकदा ‘डीडीएलजे’ची कहाणी तयार झाली. यानंतर  या चित्रपटासाठी शाहरुख खान आणि काजोलची निवड करण्यात आली होती.

जुगाड करूनही चमकले नाहीत नाशिबाचे तारे! आता 'हा' बॉलिवूड अभिनेता सांभाळतोय ४७ हजार कोटींचा बिझनेस

काय होती 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'ची कथा? 

या चित्रपटाची कथा राज (शाहरुख खान) आणि सिमरन (काजोल) यांच्याभोवती फिरते. सिमरनचे संगोपन तिच्या बाऊजी अर्थात अमरीश पुरी यांच्या कडक नियमांनुसार होते. त्याचबरोबर राज हा मुक्त विचारांचा मुलगा आहे, जो आपलं आयुष्य मोकळेपणाने जगत असतो. प्रवासादरम्यान दोघांची भेट होते आणि ते प्रेमात पडतात. पण, सिमरनचं तिच्या वडिलांच्या मित्राच्या मुलाशी लग्न आधीच ठरलेलं आहे आणि तिला वडिलांच्या विरोधात जाण्याची भीती वाटते. पण, जिथे राज मागे हटण्यास तयार नव्हता. तिथे तो सिमरनच्या घरच्यांची समजूत काढण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आणि शेवटी खऱ्या प्रेमाचाच विजय होतो.

Whats_app_banner