बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता शाहरुख खानला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक प्रकृती खालावल्यामुळे शाहरुखला अहमदाबाद येथील केडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची प्रकृती अचानक खालावली आहे. उन्हामुळे डीहायड्रेशन झाल्यामुळे शाहरुखला अहमदाबादमधील केडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार केल्यानंतर शाहरुखला दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शाहरुखच्या कुटुंबीयांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
वाचा: 'इसको बोलते है....', बिग बॉस मराठीमध्ये महेश मांजरेकरांची जागा रितेशने घेताच शेवंताने केली कमेंट
शाहरुख खान रुग्णालयात दाखल होताच चाहत्यांमध्ये चिंत्तेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चिंता व्यक्त केली आहे. एका यूजरने 'बापरे अचानक शाहरुखला काय झाले? त्याची प्रकृती आता कशी आहे' अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'किंग खान लवकर बरा हो' असे म्हटले आहे.
वाचा: नेहमी तर आईसोबत दिसते, मग शाळेत कधी जाते?; आराध्याला ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्याचे उत्तर
नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, पण त्यांचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला कारण संघ १९.३ षटकात १५९ धावांवर सर्वबाद झाला. संघासाठी सर्वात मोठी खेळी राहुल त्रिपाठीने खेळली. त्याने ३५ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५५ धावा केल्या. तर संघाचे एकूण ४ फलंदाज शुन्यावर पॅव्हेलियनमध्ये परतले.
वाचा: Gui Gadkari Health: अभिनेत्री जुई गडकरी अजूनही आजारीच, चाहतीच्या कमेंटवर दिले उत्तर
त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताने अवघ्या १३.४ षटकांत विजय मिळवला. संघासाठी, कर्णधार श्रेयस अय्यरने २४ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ५८ धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. याशिवाय व्यंकटेश अय्यरने २८ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ५१* धावा केल्या.
वाचा: उष्माघाताचा वाढतोय धोका, घर थंड ठेवण्यासाठी फॉलो करा या टिप्स
शाहरुख खानच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर त्याचा 'डंकी' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने हवी तशी बॉक्स ऑफिसवर कमाई केली नाही. पण जवान आणि पठाण हे दोन्हीही शाहरुखचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसले.
संबंधित बातम्या