मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shah Rukh Khan: गुपचुप व्हिडीओ काढणाऱ्या चाहत्याला शाहरुखने पाहिले अन्...

Shah Rukh Khan: गुपचुप व्हिडीओ काढणाऱ्या चाहत्याला शाहरुखने पाहिले अन्...

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 17, 2024 02:24 PM IST

Shah Rukh Khan Viral Video: सध्या सोशल मीडियावर शाहरुखचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो चाहत्यावर चिडलेला दिसत आहे.

Shah Rukh Khan
Shah Rukh Khan

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख हा कायमच चर्चेत असतो. २०२३ या एका वर्षात शाहरुखचे एकापोठापाठ एक असे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. त्याच्या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. सध्या सोशल मीडियावर शाहरुखचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो चाहत्यावर चिडलेला दिसत आहे.

शाहरुख हा सतत त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. कधी सोशल मीडियाच्या माध्यमातून तर कधी घराबाहेर उभ्या असलेल्या चाहत्यांची भेट घेऊन. या सगळ्यात शाहरुख त्याचा मूड चांगला असेल चाहत्यांसोबत मजामस्ती करताना दिसतो. पण नुकताच शाहरुख एका चाहत्यावर रागावताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वाचा: कतरिना कैफ आणि विजय सेतुपतीचा 'मेरी ख्रिसमस' येणार ओटीटीवर

व्हिडीओमध्ये दिसत आहे की शाहरुख त्याची मॅनेजर पूजासोबत कारमध्ये बसत असतो. दरम्यान, शाहरुखने काळ्या रंगाचा हॉडी घातलेला असतो. फोटोग्राफर्स शाहरुखला कॅमेरामध्ये कैद करत असतात. तेव्हा शाहरुखने चाहत्याला गुपचूप व्हिडीओ करताना रागात थांबवले आहे. शाहरुखच्या या कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर शाहरुखचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

शाहरुखच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्याने ४ वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. एका मागोमाग एक असे तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहे. यामध्ये 'जवान', 'पठाण' आणि 'डंकी' हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे.

WhatsApp channel

विभाग