शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी खूशखबर! सप्टेंबरमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार 'हे' दोन हिट सिनेमे-shah rukh khan films veer zara and pardes to re release in september ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी खूशखबर! सप्टेंबरमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार 'हे' दोन हिट सिनेमे

शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी खूशखबर! सप्टेंबरमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार 'हे' दोन हिट सिनेमे

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 01, 2024 07:19 PM IST

शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शाहरुख खानचे दोन रोमँटिक हिट चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत.

shah rukh khan
shah rukh khan

बॉलिवूडने गेल्या अनेक वर्षांत प्रेक्षकांना उत्तम चित्रपट दिले आहेत. हॉरर चित्रपट असोत, कॉमेडी असोत किंवा रोमान्स, बॉलिवूडने तुम्हाला सर्व प्रकारचे सिनेमे दाखवले आहेत. आता बॉलिवूडचे जुने सिनेमे थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या मालिकेची सुरुवात इम्तियाज अलीच्या रॉकस्टार या चित्रपटापासून झाली. हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला तेव्हा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आता शाहरुख खानचे दोन सिनेमे पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत.

परदेस हा सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खानचा परदेस हा चित्रपट सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा चित्रपटगृहात दाखल होणार आहे. शाहरुख खानचा परदेस हा चित्रपट १९९७ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शाहरुख खान, महिमा चौधरी आणि अपूर्व अग्निहोत्री यांच्याही भूमिका होत्या. हा चित्रपट २० किंवा २७ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ शकतो. आता पुन्हा प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

वीर-झारा

शाहरुख खानच्या दुसऱ्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाचे नाव वीर-झारा आहे. 'वीर-झारा' हा शाहरुख खानचा सर्वोत्कृष्ट रोमँटिक चित्रपट मानला जातो. या चित्रपटात शाहरुख खानसोबत प्रिती झिंटा दिसली होती. त्यावेळी हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. शाहरुख खानचा हा चित्रपट १३ सप्टेंबरला पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिपोर्टनुसार, दररोज चित्रपटाचे काही ना काही शो होणार असून मागणीनुसार शो वाढवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
वाचा: 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातील अभिनेत्याचे नवे गाणे प्रदर्शित, सोशल मीडियावर तुफान व्हायरल

शाहरुख खानच्या चित्रपटांव्यतिरिक्त ऐश्वर्या राय बच्चनचा 'ताल' हा चित्रपटही सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २० सप्टेंबररोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय, अनिल कपूर आणि अक्षय खन्ना झळकले होते. तुंबाड हा हॉरर चित्रपटही १३ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी हा चित्रपट ३० ऑगस्टरोजी प्रदर्शित होणार होता. तर पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये हम आपके हैं कौन, दंगल, लव्ह आज कल, गँग्स ऑफ वासेपूर आणि लैला मजनू या चित्रपटांचा समावेश आहे.