मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  आता कशी आहे शाहरुख खान याची तब्येत? जवळची मैत्रीण-अभिनेत्री जुही चावला हिने दिली हेल्थ अपडेट!

आता कशी आहे शाहरुख खान याची तब्येत? जवळची मैत्रीण-अभिनेत्री जुही चावला हिने दिली हेल्थ अपडेट!

May 23, 2024 08:07 AM IST

उष्माघातामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या शाहरुख खान याची तब्येत आता कशी याची माहिती त्याची सहकलाकार आणि कोलकाता नाईट रायडर्सची सहमालकीण जुही चावला हिने दिली आहे.

आता कशी आहे शाहरुख खान याची तब्येत? जवळची मैत्रीण-अभिनेत्री जुही चावला हिने दिली हेल्थ अपडेट!
आता कशी आहे शाहरुख खान याची तब्येत? जवळची मैत्रीण-अभिनेत्री जुही चावला हिने दिली हेल्थ अपडेट!

उष्माघातामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या अभिनेता शाहरुख खान याची तब्येत आता कशी याची माहिती त्याची सहकलाकार, जवळची मैत्रीण आणि कोलकाता नाईट रायडर्सची सहमालकीण जुही चावला हिने दिली आहे. ‘न्यूज १८’ला दिलेल्या मुलाखतीत जुहीने चाहत्यांना सांगितले की, ‘शाहरुख खान याची आता बरी असून, तो खूप लवकर रिकव्हर होत आहे. इतकंच नाही तर, या रविवारी इंडियन प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी तो मैदानावर परत येईल.’

ट्रेंडिंग न्यूज

काय म्हणाली जुही चावला?

अभिनेता शाहरुख खान याच्या तब्येतीबद्दल माहिती देताना जुही चावला म्हणाली की, ‘काल रात्री शाहरुखला बरं वाटत नव्हतं, त्याच्यावर लगेच उपचार सुरू करण्यात आले होते आणि आज त्याला खूप बरं वाटत होतं. देवाची इच्छा असेल, तर तो लवकरच ठणठणीत बरा होईल आणि वीकेंडला स्टँडवर उभा राहून फायनलची मॅच खेळताना आपल्या टीमचा उत्साह वाढवेल.’ बुधवारी शाहरुखला डिहायड्रेशन आणि उष्माघाताचा त्रास झाल्यानंतर जुही चावला आणि तिचे पती जय मेहता त्याला अहमदाबादच्या केडी रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी धावत रुग्णालयात पोहोचलेली शाहरुखची पत्नी गौरी खानही चिंतेत दिसत होती.

‘बर्थडे गर्ल’ तेजस्विनी पंडितने कोणत्या चित्रपटातून केली होती करिअरची सुरुवात? ‘या’ चित्रपटांनी मिळवून दिली ओळख!

सामना पाहण्यासाठी शाहरुख होता अहमदाबादमध्ये!

अहमदाबाद (ग्रामीण) अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुखला उष्माघाताचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी केकेआर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल सामना पाहण्यासाठी तो अहमदाबादमध्ये आला होता.

शाहरुखसोबत त्याची मुलगी सुहाना खान, धाकटा मुलगा अबराम आणि मॅनेजर पूजा ददलानी देखील उपस्थित होते. केकेआरच्या सहमालक जुही चावला आणि जय मेहता आणि सुहानाच्या जवळच्या मैत्रिणी अनन्या पांडे, शनाया कपूर, नव्या नंदा आणि अगस्त्य नंदा यांनीही मंगळवारी संध्याकाळी स्टेडियममध्ये उपस्थित राहून ‘केकेआर’ टीमचा उत्साह देखील वाढवला.

आजी घेणार लीलाकडून मोठं वचन! करावं लागणार का एजेशी लग्न? ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत मोठं वळण

चाहते आणि प्रेक्षकांनाही भेटला!

सामन्यानंतर एसआरके, सुहाना आणि अबराम यांनी नरेंद्र मोदी स्टेडियमभोवती फिरून आपल्या प्रेक्षकांचे स्वागत केले. ‘जवान' स्टार शाहरुखने केवळ हात जोडून प्रेक्षकांना अभिवादन केले नाही, तर आपल्या सिग्नेचर पोझने सगळ्यांना मंत्रमुग्ध केले.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, शाहरुख खान राजकुमार हिरानीच्या 'डंकी' या चित्रपटात दिसला होता. अभिनेता जुलैमध्ये त्याच्या आगामी ‘किंग’ या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करेल. दरम्यान, जुही शेवटची 'द रेल्वे मॅन' या चित्रपटात दिसली होती. तिने शाहरुखसोबत ‘येस बॉस’, ‘डर’पासून ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’पर्यंत एक डझनहून अधिक चित्रपट केले आहेत. ‘अशोका’ आणि ‘चलते चलते’ यांसारख्या चित्रपटांमध्ये ती शाहरुखसोबत सहनिर्माती ही होती.

टी-२० वर्ल्डकप २०२४