hurun india list : शाहरुख खानची संपत्ती आहे तरी किती? बॉलिवूडच्या ‘रईस’ला मिळालं श्रीमंतांच्या खास यादीत स्थान!-shah rukh khan debuts on hurun india list with a net worth of rs 7300 crore ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  hurun india list : शाहरुख खानची संपत्ती आहे तरी किती? बॉलिवूडच्या ‘रईस’ला मिळालं श्रीमंतांच्या खास यादीत स्थान!

hurun india list : शाहरुख खानची संपत्ती आहे तरी किती? बॉलिवूडच्या ‘रईस’ला मिळालं श्रीमंतांच्या खास यादीत स्थान!

Aug 29, 2024 02:59 PM IST

Shah Rukh Khan In Hurun India: हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये शाहरुख खानने एन्ट्री घेत जुही चावला, हृतिक रोशन, अमिताभ बच्चन आणि करण जोहरला मागे टाकले आहे.

Shah Rukh Khan: शाहरुख खानची एकूण संपत्ती ऐकलीत का?
Shah Rukh Khan: शाहरुख खानची एकूण संपत्ती ऐकलीत का?

Shah Rukh Khan debuts on Hurun India list: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये पदार्पण केले असून, २०२४पर्यंत त्याची एकूण संपत्ती ७,३०० कोटी रुपये इतकी झाली आहे. त्याची ही संपत्ती केवळ त्याच्या प्रॉडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेन्मेंटमधूनच नाही, तर आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्समधील त्याच्या होल्डिंग्समधूनही मिळाली आहे. कोलकाता नाईट रायडर्समधील त्याच्या होल्डिंग्सच्या वाढत्या किंमतीमुळे त्याने या यादीत प्रवेश केला आहे. सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत आता शाहरुखने आपले स्थान निर्माण केले आहे.

या यादीत शाहरुख खानने जुही चावला आणि कुटुंब (४,६०० कोटी), हृतिक रोशन (२,००० कोटी), अमिताभ बच्चन आणि बच्चन परिवार (१,६०० कोटी) आणि करण जोहर (१,४०० कोटी) यांना मागे टाकले आहे. जुही चावला आणि परिवाराची नाईट रायडर्स स्पोर्ट्स कंपनी आहे, जी नाईट रायडर्स ग्रुपची एक संयुक्त कंपनी आहे, ज्याद्वारे अभिनेत्री आणि तिचा पती जय मेहता संयुक्तपणे कोलकाता नाईट रायडर्सचे मालक बनले आहेत.

Viral Video: हा शाहरुख खानचा उर्मटपणा? वृद्ध व्यक्तीला दोन्ही हातांनी दिला धक्का! व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

कुठून येतेय सगळी संपत्ती?

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची संपूर्ण संपत्ती त्याच्या फॅशन ब्रँड एचआरएक्समधून आलेली आहे. तर,अमिताभ बच्चन यांची संपत्ती त्यांच्या गुंतवणुकीतून आणि करण जोहरची संपत्ती धर्मा प्रॉडक्शन या प्रॉडक्शन हाऊसमधून कमवण्यात आली आहे, असे या यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

सोशल मीडियाच्या बाबतीतही शाहरुख खान ‘किंग’ ठरला आहे. त्याने हृतिक रोशन आणि करण जोहरला मागे टाकत एकूण ४४१ लाख फॉलोअर्स मिळवले आहेत. त्यानंतर हृतिक रोशन आणि करण जोहर अनुक्रमे ३२३ लाख फॉलोअर्स आणि १७० लाख फॉलोअर्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

भारतीय श्रीमंतांची एकूण संपत्ती जीडीपीच्या निम्म्याहून अधिक!

हुरुन इंडियाच्या श्रीमंतांच्या यादीतील एकूण संपत्ती यावेळी १५९ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे, जी सौदी अरेबिया आणि स्वित्झर्लंडच्या एकत्रित जीडीपीपेक्षा जास्त आहे. तर, भारताच्या जीडीपीच्या निम्म्याहून अधिक आहे. हुरुन इंडियाच्या या यादीत समाविष्ट असलेले लोक एकूण २९ उद्योग आणि ४२ शहरांतील आहेत. यापैकी १३३४ जणांची संपत्ती भरपूर वाढली आहे. यात २७२ नवीन चेहरे सामील झाले आहेत. ४५ जण या यादीतून गायब झाले आहेत, तर पाच जणांचे निधन झाले आहे. या यादीत मुंबईतील सर्वाधिक ३८६ श्रीमंतांचा समावेश आहे. २१७ नावांसह दिल्ली दुसऱ्या स्थानावर आहे आणि हैदराबाद १०४ नावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. या वर्षी मुंबईतून ६६ नवीन नावे यादीत समाविष्ट झाली आहेत.

विभाग