बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जगभरातील लोकांच्या मनावर राज्य करत आहे. चित्रपटातील अभिनयासोबतच शाहरुख खान इव्हेंट्समध्येही परफॉर्म करतो. नुकताच शाहरुख खान दिल्लीत एका लग्नसमारंभात सहभागी झाला होता. या लग्नात शाहरुख खाननेही परफॉर्म केले होते. या लग्नातील शाहरुख खानचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चाहते विचारत आहेत की, शाहरुख खानने या लग्नात परफॉर्म करण्यासाठी किती पैसे घेतले? मेकअप आर्टिस्टने चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत.
कलाकार ब्राइडल मेकअप करणारी अमृत कौरने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख खान डान्स करताना दिसत आहे. तो वधू-वरांसमोर आपली स्वाक्षरी करताना दिसतो आणि त्याचवेळी तो वधूला सांगताना दिसतो की, तू खूप सुंदर आहेस. शाहरुखचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
अमृत कौरने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिल्लीमधील लग्नाचे व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. शाहरुखचा हा व्हिडीओ शेअर करत अमृत कौरने लिहिले की, "शाहरुख खान, ज्या प्रकारे तू माझ्या वधूचे कौतुक केलेस, माझा दिवस बनला आहे. त्या दिवशी माझी मेहनत फळाला आली." सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत शाहरुखच्या मानधनाविषयी देखील विचारले आहे. अमृतने त्यावर प्रतिउत्तर देखील दिले आहे.
Pushpa 2 The Rule review: 'पुप्षा २' पाहायला जाताय? थांबा! आधी हे वाचा आणि मग निर्णय घ्या
या व्हिडीओवर शाहरुखच्या चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, 'ही सर्वात नशीबवान मुलगी आहे.' तर एकाने लिहिले की, कोणीतरी माझे स्वप्न पूर्ण केले आहे. या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत शाहरुखने या लग्नात परफॉर्म करण्यासाठी किती पैसे घेतले असा प्रश्न विचारला. यातील एका युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना मेकअप आर्टिस्टने सांगितले की, शाहरुख हा वधू-वरांचा फॅमिली फ्रेंड आहे. तर शाहरुखने किमान ६० लाख किंवा त्यापेक्षा जास्त पैसे घेतले असावेत, अशी कमेंट लोकांनी केली आहे.
संबंधित बातम्या