मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Umang 2022: शाहरुख आणि शहनाज गिलचा धमाकेदार डान्स परफॉर्मन्स
उमंग २०२२
उमंग २०२२ (HT)
27 June 2022, 14:05 ISTAarti Vilas Borade
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
27 June 2022, 14:05 IST
  • त्यांच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चर्चेत आहे.

बिग बॉस १३ या छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितक्याच वादग्रस्त शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे शहनाज गिल. आयुष्यात अनेक चढ-उतार आल्यानंतरही शहनाजने कधी मागे वळून पाहिले नाही. तिचा संघर्ष सर्वांनी पाहिला आहे. आता शहनाजने मुंबई पोलीस अधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या उमंग २०२२ या सोहळ्यात डान्स केला आहे. तिच्यासोबत शाहरुखन खान देखील दिसला होता. त्यांच्या डान्सची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

शाहरुख खानने नुकताच इंडस्ट्रीमध्ये ३० वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानंतर त्याने मुंबई पोलिसांसाठी उमंग २०२२ या कार्यक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्याने जबरदस्त डान्स करत चाहत्यांची मने जिंकली. शाहरुख आणि शहनाजच्या डान्सचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

शाहरुखने या कार्यक्रमाला बाईकवरुन एण्ट्री केली. त्याच्या एण्ट्रीने अनेकांची मने जिंकली. त्यानंतर त्याने त्याचा सुपरहिट चित्रपट 'फिर भी दिल है हिंदुस्तानी'मधील गाण्यावर डान्स केला. शाहरुखचा जबरदस्त कमबॅक पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे.

तर दुसरीकडे कायम चर्चेत असणाऱ्या शहनाजच्या डान्सची जोरदार चर्चा सुरु होती. तिने अभिनेत्री कतरिना कैफचे सुपरहिट गाणे 'चिकनी चमेली'वर ठेका धरला होता. त्यासोबतच तिने अभिनेते अनिल कपूर यांच्यासोबतही डान्स केला.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook