Viral Video On Social Media : बॉलिवूड किंग शाहरुख खान याचे चाहते अभिनेता सलमान खानच्या एका चाहत्याला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करत आहेत. सलमान खानचा चाहता सुरजीत हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर युजर आहे. या युजरने आपल्या बायोमध्ये दावा केला आहे की, तो सलमान खानचा मोठा फॅन आहे. या व्यक्तीने आपल्या सोशल मीडिया आयडीवरून आयफा २०२४चा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख खान आयफा २०२४ होस्ट करताना टेलिप्रॉम्पटरचा वापर करताना दिसत आहे. हा टेलिप्रॉम्प्टर प्रेक्षकांच्या मागे ठेवण्यात आला असून, त्यात आयफा २०२४ची स्क्रिप्ट मोठ्या अक्षरात लिहिलेली दिसत आहे, जी शाहरुख स्टेजवर उभा राहून वाचत आहे.
सलमान खानच्या चाहत्याने म्हणजेच सुरजीत याने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, ‘आयफा २०२४ अवॉर्ड शो होस्ट करताना शाहरुख खानने टेलिप्रॉम्पटरचा वापर केला होता.’ आता त्याने हा व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करताच शाहरुख खानच्या चाहत्यांना सुरजीतची ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही. यावरूनच दोघांच्या चाहत्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आणि त्यांनी दोन्ही अभिनेत्यांसह सुरजीतला देखील ट्रोल करण्यास सुरुवात केली.
एका युजरने सुरजीतच्या या व्हिडीओवर कमेंट करत लिहिलं की, ‘ही काही मोठी गोष्ट नाही, म्हणजे आजकाल टेलिप्रॉम्प्टर कोण वापरत नाही? ज्यांना शो होस्ट करण्याचा भरपूर अनुभव आहे ते देखील टेलिप्रॉम्प्टरचा वापर करतात.’ आणखी एका युजरने लिहिले की, ‘तुमचा सलमान खान देखील टेलिप्रॉम्प्टर वापरतो.’ तिसऱ्या एकाने लिहिलं की, ‘काय प्रॉब्लेम आहे? ३० मिनिटांच्या कार्यक्रमाची पटकथा कोणी लक्षात ठेवू शकेल असे वाटते का? हा एक अवॉर्ड शो आहे - प्रत्येक गोष्टीची एक स्क्रिप्ट असते.’ चौथ्याने लिहिले की, "हे लोक २००० पासून टेलिप्रॉम्प्टर वापरत आहेत; तुला आज कळलं का?'
सोशल मीडियावर सध्या यावरून चांगलंच युद्ध रंगलं आहे. दोन्ही कलाकारांचे चाहते यावरून एकमेकांना चांगलंच ट्रोल करताना दिसत आहे. यावरून दोघांच्या चाहत्यांमध्ये आता चांगलेच शाब्दिक वाद होताना दिसत आहेत. या वादाचा विषय टेलिप्रॉम्पटर असला तरी, आता चाहत्यांनी अनेक वेगवेगळे मुद्दे काढून वाद निर्माण करण्यास सुरुवात केल्याचे देखील पाहायला मिळत आहे.