Shah Rukh Khan Jawan OTT Release: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा ‘जवान’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. नयनतारा आणि शाहरुख खान यांचा हा चित्रपट प्रेक्षकांना देखील खूप आवडला आहे. आता हा चित्रपट लवकरच ४०० कोटींचा टप्पा पार करणार आहे. या दरम्यान आता शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता ‘जवान’ हा चित्रपट घरबसल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघता येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ‘जवान’ या चित्रपटाचे ओटीटी अधिकार कोट्यवधींमध्ये विकले गेले आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर नेटफ्लिक्सने यात बाजी मारल्याचे म्हटले जात आहे.
थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 'जवान'ची ओटीटी रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, या चित्रपटाचे ओटीटी राइट्स किती कोटींना विकले गेले, याची माहिती आता समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांनी 'जवान' या चित्रपटाचे ओटीटी अधिकार तब्बल २५० कोटी रुपयांना विकले आहेत. मात्र, अद्याप याविषयी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, आता याबद्दल लवकरच जाहीर करण्यात येईल, असे म्हटले जात आहे.
'जवान'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने गेल्या सहा दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर ३४५ कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर ६२१ कोटींची कमाई केली आहे. शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. आज हा चित्रपट ४०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपट ९व्या दिवशी १९.५० कोटींची कमाई करू शकतो. त्यानंतर या चित्रपटाचे एकूण कलेक्शन ४०७.५८ कोटी रुपये होईल. ‘जवान’ ९व्या दिवशीच ४०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे.
संबंधित बातम्या