'मुन्नाभाई एमबीबीएस' सिनेमासाठी शाहरुख खान होता पहिली पसंती, का दिला नकार जाणून घ्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'मुन्नाभाई एमबीबीएस' सिनेमासाठी शाहरुख खान होता पहिली पसंती, का दिला नकार जाणून घ्या

'मुन्नाभाई एमबीबीएस' सिनेमासाठी शाहरुख खान होता पहिली पसंती, का दिला नकार जाणून घ्या

Aarti Vilas Borade HT Marathi
May 02, 2024 09:57 AM IST

शाहरुख खानने काही कारणास्तव 'मुन्नाभाई एमबीबीएस' या चित्रपटाला नकार दिला आहे.

'मुन्नाभाई एमबीबीएस' सिनेमासाठी शाहरुख खान होता पहिली पसंती, का दिला नकार जाणून घ्या
'मुन्नाभाई एमबीबीएस' सिनेमासाठी शाहरुख खान होता पहिली पसंती, का दिला नकार जाणून घ्या

बॉलिवूडमधील 'मुन्नाभाई एमबीबीएस' हा चित्रपट तुफान हिट ठरला होता. या चित्रपटातील संजय दत्तची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. पण तुम्हाला माहिती आहे का संजय दत्त ऐवजी या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार होता. शाहरुख खानने काही कारणास्तव या चित्रपटाला नकार. पण असे काय कारण होते की शाहरुखला नकार द्यावा लागला असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

राजकुमार हिराणी दिग्दर्शित 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटासाठी शाहरुख खान पहिली पसंती होता. २००३ साली शाहरुखला सर्वात पहिले विचारण्यात आले होते. आता एका मुलाखतीमध्ये मकरंद देशपांडे यांनी सांगितले की सर्किट ही भूमिका ते साकारणार होते आणि शाहरुख मुन्ना भाईची भूमिका साकारणार होता. पण त्याच्या तारखा जुळून येत नसल्यामुळे संजय दत्तची वर्णी करण्यात आली. तसेच या चित्रपटासाठी जेव्हा विचारण्यात आले होते तेव्हा शाहरुखच्या हाताला दुखापत झाली होती. या दोन्ही कारणांमुळे शाहरुखला चित्रपटाला नकार द्यावा लागला.
वाचा: सरोजने कलासाठी आखला मोठा डाव, अद्वैतला कळताच काय होणार 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत

शाहरुखच्या आवाज झाले होते गाणे रेकॉर्ड

मकरंद देशपांडे यांनी सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटाविषयी वक्तव्य केले. 'या चित्रपटाचे काही सीन्स शूट करण्यात आले होते आणि चित्रीकरणादरम्यान त्यामध्ये सुधारणा करण्यात आली. इतकच नाही तर शाहरुखच्या आवाजात एक गाणे रेकॉर्ड करण्यात आले होते. राजकुमार हिराणी यांनी शाहरुखकडे ५६ दिवसांचा कालावधी मागितला होता. पण शाहरुखला ते मॅनेज करता नाही आले' असे मकरंद म्हणाले.
वाचा: कार्तिकने घटस्फोटाच्या पेपरवर सही करण्यास दिला नकार, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत काय असणार सागरचे पुढचे पाऊल

शाहरुखने का चित्रपट सोडला?

मकरंद देशपांडे यांनी पुढे सांगितले की, 'मला काळाले आहे की माझ्या आयुष्यातील वेळ हा सर्वात महत्त्वाचा आहे. कोण मला कोणती भूमिका देत आहे, त्या भूमिकेमुळे मला प्रसिद्धी मिळणार की नाही, पैसे मिळणार का? इतर गोष्टींवर याचा परिणाम होईल का? हे सगळे प्रश्न मला अजिबात पडत नाहीत. त्यावेळी शाहरुखच्या हाताला देखील दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला हा चित्रपट करता आला नाही.'
वाचा: चित्रपट पाहण्याचा विचार करत आहात? मग हे दोन मराठी सिनेमे चांगला पर्याय ठरु शकतात

Whats_app_banner