बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते आणि लाडके कपल म्हणून अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान ओळखली जाते. या कपलची लव्हस्टोरी देखील सर्वांना माहिती आहे. गौरी छिब्बर ही धर्माने मुस्लीम असलेला शाहरुख खानच्या प्रेमात पडली. कुटुंबीयांचा विरोध असतानाही दोघांनी लग्न केले. अनेक आव्हानांचा सामना करत शाहरुख खानने प्रचंड मेहनत करत शेवटी पत्नी आणि मुलांना असे आयुष्य दिले आहे जे एखादा पुरुष आपल्या कुटुंबीयांना देण्यासाठी धडपड करत असतो. शाहरुख खानच्या घरातही ईद साजरी केली जाते आणि दिवाळीही, त्याचे घर मन्नत धार्मिक ऐक्याचे प्रतीक मानले जाते. सध्या सोशल मीडियावर गौरीचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये तिने हिजाब घातल्यामुळे धर्मांतर केल्याची चर्चा रंगली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोमुळे शाहरुख खान आणि गौरी खान यांच्यामधील संबंधांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या फोटोत शाहरुख खान आणि गौरी खान आपला मुलगा आर्यन खानसोबत मक्केत दिसत आहेत. गौरी खानने हिजाब परिधान केला आहे. हा फोटो पाहून अनेकांनी लग्नाच्या ३३ वर्षांनंतर शाहरुखने गौरीचे धर्मांतर केल्याची चर्चा रंगली आहे. खरंच असं घडलं आहे का? शाहरुख आणि गौरीने १९९१ मध्ये लग्न केले. त्यानंतर अनेकदा गौरीला धर्मांतर केले का? असा प्रश्न विचारण्यात आला होता.
शाहरुख खानने खरंच आपली पत्नी गौरी खानचं धर्मांतर केलं आहे का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तर याचे उत्तर नाही असे आहे. कारण हा फोटो एआयच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. शाहरुख खानच्या चाहत्यांना ही बाब आधीच समजली होती आणि म्हणूनच त्यांनी खरी माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात केली. शाहरुख खान आणि गौरी खानयांच्या या फोटोपूर्वीही अनेक सेलिब्रिटींना डीपफेकचा सामना करावा लागला आहे.
Aaradhya Video: अचानक विमानतळावर उड्या मारताना दिसली आराध्या, नेमकं काय झालं?
शाहरुख खानपूर्वी राधिका आपटे आणि रश्मिका मंदाना यांच्यासह अनेक अभिनेत्रींचे डीपफेक फोटो व्हायरल झाले आहेत, ज्याचा सर्वत्र निषेध करण्यात आला आहे. शाहरुख खान आणि गौरी खान यांनी २५ ऑक्टोबर १९९१ रोजी पारंपारिक हिंदू पद्धतीने लग्न केले होते. जवळपास ६ वर्षे दोघे रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यानंतर दोघांनी लग्न केले. त्यांना आर्यन खान, सुहाना खान आणि अबराम खान अशी तीन मुले आहेत. सुहानाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असले तरी आर्यनने अद्याप सिनेसृष्टीत पाऊल ठेवलेले नाही.
संबंधित बातम्या