१३ मार्च १९९६ रोजी झालेली भारत विरुद्ध श्रीलंका सेमी फायनल मॅच आठवते का तुम्हाला? भारतासमोर २५३ धावांचा आव्हान होते. मात्र, मॅच चांगली रंगात आली असताना अचानकच मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर ६५ धावा करून जयसूर्याच्या बॉलवर आउट झाला. या धक्का करोडो भारतीयांसोबत एका कलाकाराला देखील बसला. या धक्क्याने अभिनेत्याचा जीव गेला. आता हा अभिनेता कोण? त्याच्यासोबत नेमकं काय झालं? चला जाणून घेऊया...
शफी इनामदार असे या अभिनेत्याचे नाव आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरीच्या दापोली या गावात एका मुस्लिम कुटुंबात जन्मलेले शफी हे मराठी हिंदी गुजराती रंगभूमीवरील एक मोठं नाव होत. मराठीतील अनेक गाजलेल्या नाटकांचे त्यांनी हिंदी गुजराती रूपांतरण करून त्यांचं दिग्दर्शन केलं होत. ऐंशी नव्वदीच्या दशकातील हिंदी चित्रपटातील त्यांच्या चरित्र भूमिकादेखील प्रचंड गाजल्या.
गोविंद निहलानी यांचा विजेता चित्रपटातील विंग कमांडर पारुळकर आणि अर्ध सत्य सिनेमातील इन्स्पेक्टर हैदर अली आजही प्रेक्षकांचा लक्षात आहे. घायल, नरसिम्हा, क्रांतिवीर यासारख्या अनेक सिनेमामधून ते सहायक अभिनेत्याच्या भूमिकेत दिसले होते. मात्र त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली ती दूरदर्शन वरील ये जो है जिंदगी या विनोदी मालिकेमुळे.
शफी यांनी मराठी कलासृष्टीतील दमदार अभिनेत्री भक्ती बर्वे यांच्याशी लग्न केले होते. इंडस्त्रीमधील एक पॉवर कपल म्हणून त्यांची ख्याती होती. मात्र इतका उमदा कलाकार असूनही फार कमी वयात शफी इनामदार यांनी या जगातून निरोप घेतला. आणि त्याला कारण ठरलं एक क्रिकेट मॅच.
रंगभूमीसोबत शफी इनामदार हे क्रिकेटचे शौकीन होते. भारताचे सामने ते आवर्जून पाहायचे. १९९६ चा क्रिकेट वर्ल्ड कप हा भारतात आयोजित करण्यात आला होता, भारत या वर्ल्डकपच्या सेमी फायनल मध्ये पोहोचला होता. भारत विरुद्ध श्रीलंका असा सामना रंगणार होता. त्या दिवशी भारत श्रीलंकेसारख्या दुबळ्या संघासमोर आरामात जिंकेल असा वाटलं होते. सचिन देखील छान फटकेबाजी करत होता. मात्र ६५ धावांवर असताना सचिन जयसूर्याच्या एका बॉलवर स्टम्पआऊट झाला. सचिन जसा आउट झाला भारत हळू हळू पराभवाच्या दिशेने वाटचाल करु लागला.
वाचा: त्याने मला बेडरुममध्ये बोलावले अन्...; सोनालीने संजय दत्तसोबतच्या त्या सीनवर केले वक्तव्य
भारतात आयोजित करण्यात आलेल्या या सर्वात मोठ्या क्रिकेट सोहळ्यात भारतच वर्ल्ड कप पटकवणार या स्वप्नाला तडे जाताना पाहून अनेक भारतीयांना धसका बसला. हाच धसका अभिनेते शफी इनामदार यांनी देखील घेतला. असे सांगितले जाते कि सचिनची विकेट गेल्यांनतर झालेली पडझड पाहून शफी इनामदार यांना हृदयविकाराचा झटका आला. नाना पाटेकर यांच्यासोबतच यशवंत हा सिनेमा दुर्दैवाने त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला. शफी इनामदार एक प्रतिभावान कलाकार होते मात्र मात्र एका क्रिकेट मॅचच्या पराभवामुळे भारतीय सिनेमासृष्टी आपल्या एका उत्कृष्ट अभिनेत्याला गमावून बसली.
संबंधित बातम्या