बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय आणि सतत चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे शबाना आझमी. काही दिवसांपूर्वीच त्यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहाणी' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील त्यांचा किसिंग सीन चर्चेत होता. शबाना या सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतात. अनेकदा त्यांना ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. नुकताच शबाना यांनी एका मुलाखतीमध्ये जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. एका चित्रपटात त्यांच्याऐवजी रेखाला जेव्हा घेतले गेले तेव्हा त्या स्वत: दिग्दर्शकाकडे गेल्या आणि त्याला जाब विचारु लागल्या.
न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये शबाना यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, 'तुम्ही गेली पाच दशके इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहात. मग कोणत्या दिग्दर्शकासोबत काम करताना तुम्हाला मजा आली?' त्यावर शबाना यांनी उत्तर दिले की, 'मी ज्या दिग्दर्शकाबद्दल बोलत आहे तिच्यासोबत मला काम करायचे आहे. मी तिच्याकडे नेहमी तक्रार करायचे शेवटी तिने मला छोटीशी भूमिका दिला. ज्यामुळे आमच्या मैत्रिला न्याय मिळाला. मी जिच्याबद्दल बोलत आहे ती माझ्या शेजारी बसली आहे मीरा नायर.'
वाचा: शिवाच्या बहिणीसाठी आशू करणार गुंडांशी दोन हात, झी मराठी मालिकांमध्ये 'वटपौणिमा' विशेष भाग
मीरा आणि शबाना यांनी 'द रिलेक्टिव्ह फंडामेंटल' या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात रिझ अहमद, लिव्ह श्रायबर, केट हडसन आणि किफर सदरलँड यांच्या भूमिका आहेत. यांच्यासोबत शबाना आझमी देखील छोट्या भूमिकेत दिसल्या होत्या. पण शबाना यांनी मीराकडे काम कशाप्रकारे मागितले हे पुढे मीराने या मुलाखतीमध्ये सांगितले आहे.
वाचा: दाक्षिणात्य हॉरर सिनेमा 'नमस्ते घोस्ट' घर बसल्या पाहायचा? मग जाणून घ्या कोणत्या ओटीटीवर पाहाता येणार
शबाना आझमी यांना उत्तर देत मीरा म्हणाली की, 'मी एकदा पंचतारांकित हॉटेलच्या वॉशरुममध्ये शबाना मला भेटली. तेव्हा शबानाने मला रेखामध्ये असे काय आहे जे माझ्याकडे नाही असा प्रश्न विचारला. त्यानंतर आमचे जोरदार प्रेमभांडण झाले होते.'
वाचा: शुटिंगदरम्यान बॉलिवूड दिग्दर्शकाला दादा कोंडकेंनी खायला घातली होती बटाट्याची भाजी, वाचा किस्सा
शबाना आझमी यांनी या मुलाखतीमध्ये मीरासोबत पुन्हा काम करणार असल्याची माहिती दिली. मीरा आणि रेखा यांनी 'कामसूत्र : द टेल ऑफ लव्ह' या चित्रपटात एकत्र काम केले होते. ही भूमिका शबाना यांना साकारायची होती. पण तसे न झाल्यामुळे त्यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शिका मीरा यांना चांगलेच सुनावले होते.
संबंधित बातम्या