सप्टेंबरचा पहिला आठवडा सिनेरसिकांसाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे. खरं तर यंदाच्या वर्षातील सर्वात खतरनाक चित्रपट 'किल' चित्रपटगृहात हिट झाल्यानंतर आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. इतकंच नाही तर एक कॉमेडी ड्रामा सीरिज आणि एक अॅक्शन थ्रिलर सीरिजही ओटीटीवर धडकणार आहे. 'किल'ची रिलीज डेट आणि या दोन वेब सीरिजची नावं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला जाणून घेऊया कुठे आणि कधी पाहाता येणार हा नवा सिनेम आणि सीरिज...
सध्या सगळीकडे ओटीटी प्लॅटफॉर्मचा बोलबाला पाहायला मिळतो. अनेक नवे चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतात. काही सिनेमे तर असे आहेत जे थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतात. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि सीरिजची संख्या जास्त आहे. त्यामुळे चला जाणून घेऊया कोणता चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तसेच कोणच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार हे देखील जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
लक्ष्य, राघव जुयाल आणि तान्या माणिकतला यांचा सुपरहिट चित्रपट 'किल' ओटीटीवर झळकणार आहे. भारतातील सर्वात खतरनाक आणि हिंसक अॅक्शन थ्रिलर म्हणून ओळखला जाणारा हा चित्रपट ६ सप्टेंबरपासून ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर २४.२ कोटी रुपयांची कमाई केली. तर वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर ४७.२५ कोटी रुपयांचा गल्ला जमावला होता.
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची वेब सीरिज 'कॉल मी बे' देखील ६ सप्टेंबरला प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजमध्ये अनन्याव्यतिरिक्त वीर दास, विहान समत, गुरफतेह पीरजादा, मिनी माथुर आणि वरुण सूद सारखे कलाकार आहेत. या सीरिजचे दिग्दर्शन कॉलिन डिकुन्हा यांनी केले असून निर्माता करण जोहर आहे. आता अनन्याची ही सीरिज पाहाण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. कारण तिची प्रत्येक भूमिका ही काहीतरी वेगळी असते.
वाचा: व्हॅनिटी व्हॅनमध्ये छुपे कॅमेरे, ते कपडे बदलताना पाहायचे; अभिनेत्रीने केला खबळजनक खुलासा
'टेन्शन'च्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं होतं. अशापरिस्थितीत निर्माते आता त्याचा दुसरा सीझन घेऊन येत आहेत. 'टेन्शन २'चा ट्रेलर रिलीज झाला असून आता ही अॅक्शन-थ्रिलर सीरिज ६ सप्टेंबरपासून ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिव्हवर स्ट्रीम होणार आहे.