मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Selfiee: अक्षय-इम्रानच्या सेल्फीवर कंगनाचा निशाणा, '१० लाख रुपये पण कमावले नाही?'

Selfiee: अक्षय-इम्रानच्या सेल्फीवर कंगनाचा निशाणा, '१० लाख रुपये पण कमावले नाही?'

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 25, 2023 11:37 AM IST

Selfiee Box Office Collection: अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मीचा 'सेल्फी' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून चित्रपटाने पहिल्याच दिवशी केलेल्या कमाईने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

कंगना रणौत
कंगना रणौत (HT)

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे तिचे मत मांडताना दिसते. आता कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने करण जोहरवर निशाणा साधला आहे. 'ट्रेड एक्सपर्टसही या चित्रपटाविषयी बोलत नाहीत' असे कंगनाने म्हटले आहे.

कंगना आणि करण जोहर यांच्यामधील वाद हा जगजाहिर आहे. त्यामुळे सेल्फी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल्यानंतर तिने पोस्ट शेअर करत करणवर निशाणा साधला आहे. 'करण जोहरचा चित्रपट सेल्फीने पहिल्या दिवशी १० लाख रुपये पण कमावले नाहीत. मला एकही मीडियामधील व्यक्ती आणि ट्रेड एक्सपर्ट्सही या विषयी बोलत नसल्याचे दिसत आहे. ज्या प्रकारे ते माझे शोषण करतात त्या विषयी तर विसरुनच जातात' अशी पोस्ट कंगनाने पोस्ट शेअर केली आहे.
वाचा: अक्षय कुमार अखेर कॅनडाचं नागरिकत्व सोडणार? काय म्हणाला वाचा...

करण जोहर नेहमी घराणेशाहीला पाठिंबा देत असतो. तर कंगना या विरोधात आवाज उठवताना दिसते. अनेकदा कंगनाने करण जोहरवर गंभीर आरोप केले आहेत. अक्षयच्या सेल्फी या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात इम्रान हाश्मी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहताने केले. यापूर्वी त्याने अक्षय सोबत 'गूड न्यूज' हा चित्रपट केला होता. अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मीचा हा चित्रपट मल्याळम 'ड्रायविंग लायसेन्स' या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात इम्रान आणि अक्षयसोबत नुसरुत भरुचा आणि डायने पेंटी दिसणार आहे. हा चित्रपट २४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता अक्षयचा हा चित्रपट तरी चालणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

IPL_Entry_Point