'स्कॅम १९९२' ही वेब सीरिज २०२० साली प्रदर्शित झाली होती. ही सीरिज प्रचंड गाजली होती. हंसल मेहता दिग्दर्शित या सीरिजची कथा १९९२ साली झालेल्या शेअर बाजार घोटाळ्यावर आधारित होती, ज्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते. सोनी लिव्हवर प्रदर्शित झालेली ही सीरिज प्रचंड गाजली होती. या सीरिजमध्ये प्रतीक गांधीने मुख्य भूमिका साकारली होती तर कवीन दवे, रजत कपूर, सतीश कौशिक हे कलाकार देखील दिसले होते. पण तुम्हाला माहित आहे का या सीरिजमधील एक अशी व्यक्तिरेखा होती ज्याची कथा त्याने साकारलेल्या व्यक्तिरेखेशी अगदी मिळतीजुळती होती. अभिनेत्याने स्वत: जाऊन हंसल मेहता यांना या भूमिकेसाठी विचारले होते.
आम्ही बोलत आहोत 'स्कॅम १९९२' या सीरिजमध्ये माहेश्वरीची भूमिका साकारणारा अभिनेता परेश गंतारा याच्याविषयी. स्वत: परेशने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, या घोटाळ्यामुळे सीरिजमधील त्याच्या व्यक्तिरेखेला जसे मोठे नुकसान सोसावे लागते, तसेच खऱ्या आयुष्यातही त्याला असेच नुकसान सोसावे लागले होते. "मी तेव्हा नोकरी करत होतो. १९९१ साली कदाचित माझा पगार ४०००-५००० रुपये आणि वर्षाला ६०००० रुपये होता. त्यावेळी माझे ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले होते. मला पुन्हा तोच अनुभव आला" असे परेश म्हणाला.
पुढे तो म्हणाला, हर्षद मेहता घोटाळ्यातील नुकसान हे खूप मोठे होते. कारण रक्कम देखील मोठी होती. तसेच शेअर मार्केटमध्ये संपूर्ण सेविंग इनवेस्ट केल्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे त्याने सांगितले. "जेव्हा मला या व्यक्तिरेखेबद्दल कळलं की ही एक छोटी भूमिका आहे, तेव्हा मी हंसल सरांना सांगितलं की सर मला काहीही करून ही भूमिका करायची आहे. लहान-मोठी गरज नसते, मला फक्त १९९१ मध्ये जाणवलेला अनुभव पुन्हा अनुभवायचा आहे" असे परेश म्हणाले.
Aaradhya Video: अचानक विमानतळावर उड्या मारताना दिसली आराध्या, नेमकं काय झालं?
अभिनेता म्हणाला की, माहेश्वरी ही व्यक्तिरेखा आर. के. दमानी यांच्या व्यक्तिरेखेवर आधारित आहे. जे सध्या डी.मार्टचे मालक आहेत. त्यामुळे आर. के. दमाणी, शेअर बाजार, हर्षद मेहता, माझे वैयक्तिक नुकसान, या सर्व गोष्टी मला मिस करत होत्या. त्यामुळे ही भूमिका मलाच करावी लागेल, असे मला वाटले. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर परेश यापूर्वी 'आपका अपना झाकीर' या टीव्ही शोमुळे चर्चेत आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन सृष्टीत सक्रिय आहे. परेशने अनेक टीव्ही शो आणि मोठ्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.
संबंधित बातम्या