Manmauji Teaser: मला बायका आवडत नाहीत; 'मनमौजी' सिनेमाचा प्रदर्शित झालेला मजेशीर टीझर नक्की पाहा-sayli sanjiv upcoming movie manmauji teaser is out ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Manmauji Teaser: मला बायका आवडत नाहीत; 'मनमौजी' सिनेमाचा प्रदर्शित झालेला मजेशीर टीझर नक्की पाहा

Manmauji Teaser: मला बायका आवडत नाहीत; 'मनमौजी' सिनेमाचा प्रदर्शित झालेला मजेशीर टीझर नक्की पाहा

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 02, 2024 11:06 AM IST

Manmauji Teaser: 'मनमौजी' या चित्रपटात अभिनेत्री सायली संजीव आणि भूषण पाटील हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे.

Manmauji Teaser
Manmauji Teaser

गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. आता यामध्ये आणखी एका चित्रपटाची भर पडली. या चित्रपटाचे नाव 'मनमौजी' असे आहे. या चित्रपटात अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता भूषण पाटील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर देखील प्रदर्शित झाला आहे. हा टीझर सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

काय आहे सिनेमाची कथा?

प्रत्येक मुलीला आपला जोडीदार हा स्मार्ट, हॅंडसम, डॅशिंग असावा अशी अपेक्षा असते. अशाच एका तरुणाची गोष्ट आगामी 'मनमौजी' या चित्रपटातून उलगडणार आहे. प्रत्येक स्त्रीला हवा-हवासा वाटणाऱ्या या तरुणाच्या मनात स्त्रियांबद्दल राग असतो. कोणतीच स्त्री त्याला आवडत नसते. नात्यांचे अनेक मानसिक, भावनिक पदर असलेला हा चित्रपट येत्या नोव्हेंबर मध्ये प्रदर्शित होत असून, चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.

काय आहे 'मनमौजी'

'मनमौजी' नावावरून चित्रपटाच्या कथानकाचा अंदाज येत नाही. चित्रपटाचं पोस्टर अतिशय फ्रेश आणि युथफुल आहे. या चित्रपटाचा ३१ सेकंदाचा टीझर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हँडसम भूषणच्या मागे सर्व स्त्रीया असतात. मात्र हा हँडसम तरुणाच्या मनात स्त्रियांबद्दल राग का असतो? तो शांत होतो का? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला अजून थोडी वाट पहावी लागणार आहे. कारण चित्रपट नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
वाचा: ब्रेकअप करण्यासाठी मी दुसऱ्या मुलासोबत सेक्स करायचे; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

कोणते कलाकार दिसणार?

'मनमौजी' चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन शीतल शेट्टी यांचे असून हृषिकेश जोशी यांनी संवाद लेखन केले आहे. चित्रपटात अभिनेता भूषण पाटील अभिनेत्री सायली संजीव, सिनेसृष्टीत प्रथमच पदार्पण करणारी रिया नलावडे, जयवंत वाडकर, अरुण नलावडे, भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Whats_app_banner
विभाग