मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sayaji Shinde: सयाजी शिंदेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट, काय झाली दोघात चर्चा?

Sayaji Shinde: सयाजी शिंदेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट, काय झाली दोघात चर्चा?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 03, 2024 11:24 AM IST

Sayaji Shinde and Manoj Jarange Patil: अभिनेते सयाजी शिंदे यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटलांची यांची भेट घेतली.

Sayaji Shind and Manoj Jarange Patil
Sayaji Shind and Manoj Jarange Patil

मराठा व कुणबी एकच असून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे दोन वेळा उपोषण करून सरकारला जेरीस आणले होते. सरकारने २४ डिसेंबरची डेडलाईन न पाळल्यामुळे येत्या २० जानेवारीपासून जरांगे मुंबईतील आझाद मैदानावर पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान, अभिनेते सयाजी शिंदे यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. त्यावेळी त्या दोघांमध्ये चर्चा देखील झाली.

ट्रेंडिंग न्यूज

अभिनेते सयाजी शिंदे यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटलांची यांची भेट घेतली. मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे. जरांगेंच्या मुंबईतील मोर्चाला आमचा पाठिंबा आहे असे देखील सयाजी शिंदे यांनी या भेटीदरम्यान म्हटले.
वाचा: 'आई कुठे काय करते'मधील आरोहीने खऱ्या आयुष्यात केली नव्या प्रवासाला सुरुवात

'मराठ्यांना आरक्षण मिळायला हवे. कुठेतरी आवाज उठवला पाहिजे. मनोज जरांगे पाटीलसारख्या माणसाचे जे काही काम सुरु आहे त्याला शुभेच्छा म्हणून भेट द्यायला आलोय' असे सयाजी शिंदे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.

पुढे त्यांना मुंबईतील जरांगे पाटलांच्या मोर्च्यात मराठी कलाकार सहभागी होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, 'मोर्चामध्ये असे रस्त्यावर उतरुन ओरडले पाहिजे अशातला भाग नाही. पाठिंबा असणे हे महत्त्वाचे आहे. खरेपणाच्या बाजूने सर्वजण उभे राहतात' असे उत्तर दिले.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात मुंबई येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी आंदोलन करत असल्याचे मनोज जरांगे पाटीलयांनी आजच जाहीर केले होते.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग