झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेतील अद्वैत आणि नेत्रा या पात्रांनी सर्वांची मने जिंकली आहेत. अल्पवधीच या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या मालिकेत तितीक्षा तावडे, ऐश्वर्या नारकर, अजिंक्य ननावरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आता या मालिकेत सुरुची अडारकरची एण्ट्री झाली आहे. ती एका इच्छाधारी नागिणीच्या रुपात दिसत आहे. तिला या लूकमुळे ट्रोल केले जात आहे.
सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका सध्या रंजक वळणावर पोहोचली आहे. या मालिकेत सुरुची अडारकरची एण्ट्री झाली आहे. त्यानंतर आता मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सुरुचीचा नागिण अवतार पाहून सर्वजण चकीत झाले आहेत. ते पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच मालिकेतील कथानक पाहून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
वाचा: दीड वर्षे विचार केला; लग्नाच्या १४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा घटस्फोट, पतीने केला शिक्कामोर्तब
झी मराठीचा हा प्रोमो व्हायरल होताच एका यूजरने ‘या सिरीयलला नागीणचा लूक का दिला आहे. कसली फालतू अॅक्टिंग करतेय सुरुचीची’ अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या एका यूजरने ‘किती फालतू सिरीयल आहे बंद करा’ असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने 'काय तमाशा लावलाय हा….. लॉजिक…??' असे म्हणत निर्मात्यांना सुनावले आहे. काही यूजर्सने तर हसण्याचे इमोजी वापरले आहेत.
सुरुची अडारकरची नुकताच या मालिकेत एण्ट्री झाली आहे. यापूर्वी ती ‘का रे दुरावा’ या मालिकेत काम करत होती. या मालिकेत तिच्याबरोबर सुयश टिळकची मुख्य भूमिका होती. दोन वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर २०१६ साली या मालिकेने निरोप घेतला. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले. आता जवळपास ८ वर्षांनंतर ती पुन्हा झी मराठीवर पुनरागमन करत आहे.