Satyaprem Ki Katha Trailer Release Date: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या त्यांच्या आगामी'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आहेत. या चित्रपटाचा टीझर आणि'नसीब से' हे गाणे रिलीज झाले आहे. याशिवाय अनेक पोस्टर्सही रिलीज करण्यात आली आहेत. दरम्यान, आता या चित्रपटाचे एक नवीन पोस्टर समोर आले. यासोबतच निर्मात्यांनी चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेटही जाहीर केली आहे.
कार्तिक आर्यनने इंस्टाग्रामवर चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर केले आहे, ज्यामध्ये कार्तिक आणि कियारा रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. पोस्टरमध्ये, कियारा आणि कार्तिक दोघे प्रेमाने एकमेकांच्या डोळ्यात पाहत आहेत. चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना कार्तिक आर्यनने लिहिले, 'आज के बाद तू मेरी रहना...’ सत्यप्रेम की कथाचा ट्रेलर उद्या११.११ वाजता प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच,‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाचा टीझर सोमवारी म्हणजेच ५ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेट समोर येताच चाहते आतुर झाले आहेत. एका चाहत्याने लिहिले की, ‘चलाअखेर ट्रेलर उद्या रिलीज होत आहे.’ दुसर्याने लिहिले की, ‘सत्या आणि कथा यांना भेटण्याची वाट पाहत आहोत.’ तर, आणखी एका चाहत्याने लिहिले की, ‘आता त्यांना भेटण्याची आणखी प्रतीक्षा करू शकत नाही.’
समीर विद्वांस यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाचे नाव आधी'सत्यनारायण की कथा' असे होते, परंतु त्याच्या शीर्षकावरून झालेल्या वादामुळे त्याचे नाव'सत्यप्रेम की कथा' असे ठेवण्यात आले आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा हा चित्रपट२९ जून२०२३ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर' सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाव्यतिरिक्त कार्तिक आर्यन'आशिकी३', 'कॅप्टन इंडिया' या चित्रपटात दिसणार आहे. तर, कियारा अडवाणी'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाव्यतिरिक्त'गेम चेंजर' चित्रपटात दिसणार आहे.