SatyaPrem Ki Katha Cast Fees: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या आगामी चित्रपटाची अर्थात ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. ‘भूल भुलैय्या २’नंतर चाहत्यांना पुन्हा एकदा दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर दोन्ही समोर आले असून, दोन्हीही लोकांना खूप आवडले आहेत. कार्तिक आणि कियारा या दोघांचेही चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
'भूल भुलैय्या'नंतर कार्तिक हा नवा सुपरस्टार म्हणून उदयास आला आहे. तर, दुसरीकडे कियारा ही बॉलिवूडची चर्चित अभिनेत्री आहे. कोणत्याही चित्रपटात काम करण्यासाठी दोघेही भरमसाट फी घेतात. आता आगामी ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटासाठी कोणत्या स्टारने किती पैसे घेतले आहेत, ते जाणून घेऊया...
‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात काम करण्यासाठी कार्तिक आर्यनने भरमसाठ फी आकारली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे बजेट ५० ते ६० कोटींच्या दरम्यान आहे. तर, कार्तिकने या चित्रपटाच्या बजेटच्या जवळपास निम्मी फी घेतली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने जवळपास २५ कोटी रुपये मानधन घेतले आहे.
‘भूल भुलैयाय्या २’मध्ये कार्तिकसोबत कियाराची जोडी चांगलीच जुळली होती. आता पुन्हा एकदा दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. कार्तिकला या चित्रपटासाठी २५ कोटी रुपये मिळाले आहेत. तर, कियाराने ‘सत्यप्रेम की कथा’साठी ५ कोटी रुपये घेतले आहेत. ‘सत्यप्रेम की कथा’मध्ये अभिनेता गजराज राव कार्तिकच्या वडिलांची भूमिका साकारत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांना एक कोटी रुपये फी मिळाली आहे. सुप्रिया पाठक कार्तिकच्या आईची भूमिका साकारत असून, तिने ७५ लाख रुपये फी घेतली आहे. अभिनेत्री रितू शिवपुरीला ४० लाख आणि शिखा तलसानियाला २२ लाखांचे मानधन देण्यात आले आहे.