मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  विरोचकाला प्राप्त झाली नवी शक्ती, राजाध्यक्ष कुटुंबावर कोणतं नवीन संकट ओढवेल? वाचा मालिकेत पुढे काय होणार

विरोचकाला प्राप्त झाली नवी शक्ती, राजाध्यक्ष कुटुंबावर कोणतं नवीन संकट ओढवेल? वाचा मालिकेत पुढे काय होणार

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 19, 2024 12:17 PM IST

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. मालिकेत विरोचकाला एक नवी शक्ती प्राप्त झाली आहे. याचा परिणाम राजाध्यक्ष कुटुंबावर काय होणार? हे मीलिकेच्या आगामी भागात कळेल.

विरोचकाला प्राप्त झाली नवी शक्ती, राजाध्यक्ष कुटुंबावर कोणतं नवीन संकट ओढवेल? वाचा मालिकेत पुढे काय होणार
विरोचकाला प्राप्त झाली नवी शक्ती, राजाध्यक्ष कुटुंबावर कोणतं नवीन संकट ओढवेल? वाचा मालिकेत पुढे काय होणार

झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. मालिकेत दाखवण्यात येणारे कथानक आणि ट्विस्ट हे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसतात. नुकताच मालिकेने ५०० भागांचा पल्ला पार केला आहे ही या मालिकेची पोच पावती आहे. मालिकेत नेत्रा आणि अद्वैत यांच्या आयुष्यात नेमकं काय सुरु आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. आता मालिकेत नवे वळण आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत रोज नवीन ट्विस्ट आणि रहस्य उलगडताना दिसत आहेत. या आठवड्यात आपण पाहिले नेत्रा अस्तिकाचा वध करते. रुपाली बिथरते आणि ती अद्वैतवर हल्ला करत असते. त्याचवेळी नेत्रा हातात असलेल्या त्याच चाकूने रुपालीच्या गळ्यावर वार केला. रुपाली मेली असे सर्वांना वाटत असतानाच ती उठून बसते आणि विरोचक अमर असल्याचे सर्वाना सांगते. पण रुपालीला दक्षिण दिशेकडे जाण्याचे संकेत मिळत असतात. एका वाद्याच्या आवाजाने रुपालीला भंडावून सोडले आहे.
वाचा: मुक्ता हिला इंद्राने काढले घराबाहेर, कार्तिकचा डाव त्याच्यावरच उलटणार का? प्रेमाची गोष्ट मालिकेत काय घडणार

जाध्यक्ष कुटुंबावर कोणते नवीन संकट

त्या वाटेवर जात असतानाच रुपालीच्या हाती विरोचकाकडून एका वाद्याची खूण मिळते जे वाद्य ‘विचित्र वीणा’ आहे. विचित्र वीणाच्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत रुपाली वादन करताना तिच्या हातातून खूप रक्तस्त्राव होत असतो. या वादनातून रुपालीला नवी शक्ती प्राप्त झाली आहे. आता प्राप्त झालेली ही शक्ती राजाध्यक्ष कुटुंबावर कोणते नवीन संकट ओढवेल? काय असेल विरोचकाची नवी चाल? असे अनेक प्रश्न सर्वांना पडले आहे. मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरे मिळणार आहेत.
वाचा: तू लग्न कधी करणार?; मलायका हिने मुलगा अरहान खानला दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष

मालिकेतील कलाकारांविषयी

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत नेत्रा ही भूमिका अभिनेत्री तिथिक्षा तावडे साकारत आहे. तर अद्वैत हे पात्र अभिनेता अजिंक्य नलावडे वठवताना दिसत आहे. रुपाली म्हात्रे हे पात्र ऐश्वर्या नारकर करत आहे. मंगल ही भूमिका साक्षी परांजपेने साकारली आहे, इंद्राणी पद्माकर ही भूमिका श्वेता मेहेंदळेने साकारली आहे. सर्वच कलाकार प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरत असल्याचे दिसत आहे.
वाचा: ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! कलाकार झाले भावूक

IPL_Entry_Point

विभाग