Satvya Mulichi Satavi Mulgi Latest Episode: छोट्या पडद्यावरची रहस्यमयी मालिका ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ आता एका रंजक वळणावर पोहोचली आहे. या मालिकेत आता नायक आणि नायिका अर्थात अद्वैत-नेत्रा मिळून अवघ्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी गूढ बनलेल्या ‘मनोरमा’चं रहस्य शोधून काढणार आहेत. समोर आलेल्या सगळ्या अडचणी आणि संकटांवर मात करून अद्वैत आणि नेत्रा यांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली आहे. मात्र, आता देखील त्यांच्या संसारावर अशुभाचं सावट पसरलं आहे. परंतु, नेत्रा आणि अद्वैत मिळून या संकटाचा सामना करणार आहे. यासाठी नेत्राने त्रिनयना देवीचा गूढ ग्रंथ शोधून काढला आहे.
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने नुकतेच ३०० भाग पूर्ण केले असून, या मालिकेत आता उत्सुकता वाढवणारं नवं वळण पहायला मिळणार आहे. सध्या ‘मनोरमा’ कोण या प्रश्नाने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांनाच कोड्यात टाकलं आहे. ‘मनोरमा’ कोण आहे, याच गूढं नेत्रा आणि अद्वैत उलगडणार आहेत. ही मालिका पाहताना मनोरमाचं रहस्य आणि यातील गूढ टप्याटप्याने प्रेक्षकांना कळणार आहे.
‘मनोरमा’च्या रहस्याविषयी जाणून घेण्याची प्रेक्षकांना लागलेली ओढ पाहून, आता येत्या रविवारी म्हणजेच २० ऑगस्टला या मालिकेचा महाएपिसोड पाहायला मिळणार आहे. ‘मनोरमा’च्या रहस्याला दिशा देणारा हा महाएपिसोड असणार आहे. या महाएपिसोडमध्ये अव्दैत-नेत्राला कळणार आहे की, मनोरमाला पद्माकर आजोबा आणि भालबा म्हणजेच आबा हे दोघेही एकमेकांना ओळखतात. त्यांच्यातील हाच समान धागा पकडून, अव्दैत-नेत्रा मनोरमाचं रहस्य शोधायला सुरुवात करणार आहेत.
या गूढ ‘मनोरमा’चं राजाध्यक्षांच्या घरात नेत्राला दिसणं, पद्माकर आजोबांचं भूतकाळ आठवून अस्वस्थ होणं, इंद्राणीने रूपालीला आजोबांना मारायला सांगणं, नेत्राला दिसणाऱ्या मृत्यूच्या संकेतांची साखळी, अशा महत्त्वपूर्ण गोष्टींचा उलगडा मालिकेत लवकरच होणार आहे. अव्दैत-नेत्राने मनोरमाचा शोध घ्यायला सुरुवात केल्यामुळे मनोरमाचं सत्य काय? त्रिनयना देवीचं वरदान असलेली ती तिसरी स्त्री कोण? मनोरमाचा आत्मा स्वतःहून नेत्राला हे सगळं सांगणार का... याची उत्तरंही प्रेक्षकांना मालिका पाहताना मिळणार आहेत.
संबंधित बातम्या