मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Satvya Mulichi Satavi Mulagi: अस्तिकाला नागरूपात आणण्याचा नेत्राचा प्रयत्न, मालिका रंजक वळणावर

Satvya Mulichi Satavi Mulagi: अस्तिकाला नागरूपात आणण्याचा नेत्राचा प्रयत्न, मालिका रंजक वळणावर

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 21, 2024 12:53 PM IST

Satvya Mulichi Satavi Mulagi Serial Update: 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिका रंजक वळणावर पोहोचली आहे. आता आज या मालिकेत काय घडणार जाणून घ्या...

Satvya Mulichi Satavi Mulagi Update:
Satvya Mulichi Satavi Mulagi Update:

Satvya Mulichi Satavi Mulagi: छोट्या पडद्यावरील मालिका म्हणजे गृहिणींच्या आवडीचा विषय. कित्येक घरात संध्याकाळी केवळ मालिकाच पाहायला मिळतात. त्यामुळेच नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याकडे निर्मात्यांचा कल असतो. सध्या झी मराठी वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे. ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आहे. मालिकेत अस्तिकाला सर्वांसमोर नागरूपात आणण्यासाठी एक अनोखे महानाट्य घडणार आहे.

यज्ञ करण्याचा प्रयत्न केल्यामुळे रूपालीमधील विरोचक नेत्राला घाबरू लागतो. अशातच नेत्रा आणि इंद्राणीला विरोचकाच्या सेवकाचे रूप घेतलेल्या अस्तिकाला सर्वांसमोर नागरूपात आणण्याचा मार्ग भालबांमुळे सापडतो. नेत्राबरोबर घरातले सर्वजण गरुडदेवाच्या आरतीची तयारी करतात, घरामध्ये गरुडदेवाची मूर्ती आणली जाते. अस्तिकाला नागरूपात आणण्याचा मार्ग सांगितल्यानंतर भालबा आणि मंगला वावोशीला जायला निघतात. त्याचवेळी रूपाली दारात उभी राहून त्यांना भीती घालण्याचा प्रयत्न करते. पण ते दोघेही ठामपणे रूपालीला तोडीस तोड उत्तर देतात.
वाचा: गडबडीमुळे घोटाळा झालाय! 'लग्न कल्लोळ'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

विरोचकाचा वध माझ्या नेत्राच्या हातून होणारच असा निर्धार ते व्यक्त करून निघून जातात. रूपाली त्यामुळे बिथरते. त्याच दिवशी अस्तिकाला गरुडाच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागतात आणि ती हैराण होते आणि घाबरून रुपालीच्या खोलीत जाते. “विरोचका मला वाचवा” अशी विनंती ती करू लागते. पण अस्तिका आणि रूपाली दोघींनाही नेत्रा आणि इंद्राणीच्या खेळीचा अंदाज येत नाही आणि त्या दोघीही नेत्रा-इंद्राणीने युक्तीने टाकलेल्या जाळ्यात अडकतात.

नागरूपात अस्तिकाला आणण्याची नेत्राची युक्ती यशस्वी होणार का? अस्तिका नागरूपात आल्यावर नेत्रा तिला कोणती शिक्षा देईल? असे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. मालिकेच्या २२ फेब्रुवारीच्या भागात प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरे मिळणार आहेत.

IPL_Entry_Point

विभाग