मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर ही कायमच चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर सारा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. कारण २६ वर्षीय साराने पाकिस्तानी लाईफस्टाईल इन्फ्लुएंसर सूफी मलिकसोबत फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्या दोघीही लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. पण नेटकऱ्यांनी साराने पाकिस्तानी एलजीबीटीक्यू इन्फ्लुएंसर सूफी मलिकसोबत फोटो शेअर केल्यामुळे प्रश्न उपस्थित केले आहेत.
मंगळवारी सारा तेंडुलकरने लंडनच्या रीजेंट पार्कमध्ये काढलेले काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. लंडनमध्ये करण औजला कॉन्सर्टमध्ये सारा आणि सुफी एकत्र आल्या होत्या. साराने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये साराने बेबी पिंक टॉप परिधान केला होता. तर सूफीने काळ्या रंगाचे जॅकेट घातले होते. सुफी मलिकने ही पिकनिकचे फोटो स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. सोशल मीडियावर दोघींचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले आहेत.
सारा आणि सुफीचा व्हिडीओ पाहून सर्वजण चकीत झाले आहेत. काहींना हा पब्लिसिटी स्टंट वाटत आहे तर काहीजण हे एखाद्या ब्रँडचे प्रमोशन करत आहेत की काय? असा प्रश्न पडला आहे. सारा आणि सुफीच्या या फोटोवर जवळपास २३०० कमेंट आल्या आहेत. एका यूजरने "ओएमजी सुफी तिथे काय करत आहे?" अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या एका यूजरने "सारा आणि सूफी: आम्हाला अपेक्षित नसलेल्या क्रॉसओव्हर" असे म्हटले आहे.
सुफी मलिकचे खरे नाव सुंदस आहे. यापूर्वी सुफी ही तिच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत होती. ती अंजलीला डेट करत होती. याचवर्षी लग्नाच्या काही दिवस आधी, मार्च महिन्यात दोघींचा ब्रेकअप झाला. अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीय वंशाच्या अंजली आणि पाकिस्तानी वंशाच्या सूफी यांनी परस्पर समंतीने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या नात्याची जोरदार चर्चा रंगली होती. पण त्यांचा ब्रेकअप झाल्यावर सर्वांना धक्का बसला होता.
वाचा: विकास सेठीच्या पत्नीने शेअर केला अभिनेत्याचा जुना व्हिडिओ, पाहून डोळ्यात येतील अश्रू
साराचा कथित बॉयफ्रेंड शुभमन गिलच्या 8 सप्टेंबरच्या वाढदिवसानंतर लगेचच हे फोटो ऑनलाइन शेअर करण्यात आले आहेत.