Sara Kahi Tichyasathi Serial: छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे 'सारं काही तिच्यासाठी.' झी मराठीवरील या मालिकेतील निशी आणि नीरजच्या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांची प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला आवडत आहे. पण आता मालिका एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. नीरजचे सत्य रघुनाथ खोतांसमोर आले आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
'सारं काही तिच्यासाठी'मध्ये निशी- नीरजच्या प्रेमाची परीक्षा सुरूच आहे. आता पर्यंत मुलींना नात्यात अग्निपरीक्षा देताना पहिले असेल पण 'सारं काही तिच्यासाठी' मध्ये नेहमीच काही तरी वेगळे बघायला मिळत. नीरजने काय नाही केलं निशीच्या वडिलांचा म्हणजे रघुनाथ खोतांचा विश्वास मिळवण्यासाठी, त्याच्या आणि निशीच्या नात्याला मंजुरी मिळवण्यासाठी. खोतांच्या घराबाहेर आपलं घर मांडलं, आणि आता तर चक्क आगीत जाऊन निशीला वाचवणार आहे उमाची साथ नीरजला पहिल्या पासूनच आहे पण रघुनाथच खोतांच मन जिंकणं इतके सोपे नाही.
वाचा: महाराष्ट्राचा लाडका विनोदवीर कुशल बद्रिके हिंदीतही झळकणार! व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
नीरज आपल्या अपहरणाची बातमी ही लपवतो कारण हे सर्वानाच माहिती आहे की जर ही बातमी बाहेर पडली तर पहिला संशय रघुनाथ खोतांवरच येईल आणि नीरजला गोष्टी अजून चिघळलेल्या नको आहेत. पण उमाच्या मनात शंका आहे की नीरज काहीतरी लपवतोय आणि ती रघुनाथ खोतांसमोर हे व्यक्त करते, उमा अजून ही नीरजची बाजू घेतेय म्हणून तो संतापतो. पण शेवटी रघुनाथ खोतांसमोर नीरजच सत्य समोर येताच. नीरजचे कोणते सत्य कळलय रघुनाथला खोतांना ? ते नीरजला माफ करतील की अजून एक नवीन युद्ध सुरु होईल ? असे प्रश्न आता प्रेक्षकांना पडले आहेत. मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.
संबंधित बातम्या