मन्सूर अली खान पतौडी यांच्यानंतर सारा उतरणार निवडणुकीच्या रिंगणात? वाचा काय म्हणाली अभिनेत्री-sara ali khan opens up about her political plans ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मन्सूर अली खान पतौडी यांच्यानंतर सारा उतरणार निवडणुकीच्या रिंगणात? वाचा काय म्हणाली अभिनेत्री

मन्सूर अली खान पतौडी यांच्यानंतर सारा उतरणार निवडणुकीच्या रिंगणात? वाचा काय म्हणाली अभिनेत्री

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 27, 2024 02:07 PM IST

'आयुष्यात कधीतरी निवडणूक लढवायची आहे' असे अभिनेत्री सारा अली खानने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

मन्सूर अली खान पतौडी यांच्यानंतर सारा उतरणार निवडणुकीच्या रिंगणात? वाचा काय म्हणाली अभिनेत्री
मन्सूर अली खान पतौडी यांच्यानंतर सारा उतरणार निवडणुकीच्या रिंगणात? वाचा काय म्हणाली अभिनेत्री

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील कलाकार हे त्यांच्या चित्रपटांमधील अभिनयासोबतच खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतात. रुपेदी पडदा गाजवणारे काही कलाकार हे निवडणूकीच्या रंगणात देखील उभे असतात. याचे उदाहरण म्हणजे अभिनेत्री जया बच्चन, अभिनेत्री स्मृती इराणी, अभिनेत्री हेमा मालिनी. त्यानंतर आता नव्या पिढीमधील अभिनेत्री सारा अली खानने भविष्यात राजकारणात येणार असल्याचे सांगितले आहे.

सारा अली खानचे मर्डर मुबारक आणि ए वतन मेरे वतन हे दोन चित्रपट नुकताच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले. या दोन्ही चित्रपटातून साराने काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे. या दोन्ही चित्रपटांच्या यशानंतर तिने सँडअप कॉमेडियन आणि अभिनेता अनुभव सिंग बसीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये साराने तिच्या भूमिकांविषयी, खासगी आयुष्याविषयी अनेक वक्तव्य केले. मात्र, राजकारणाविषयी केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
वाचा: कौतुकास्पद! रितेश देशमुखची मुले फुटबॉल खेळण्यासाठी परदेशात

अनुभवने 'सध्या असे म्हटले जात आहे की तुला राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा आहे' असा प्रश्न साराला केला. त्यावर साराने 'हो' असे उत्तर दिले. त्यामुळे भविष्यात सारा निवडणुकीच्या रिंगणात असणार यावर शिक्का मोर्तब झाला आहे. साराने २०१९मध्ये देखील एका मुलाखतीमध्ये असेच वक्तव्य केले होते. 'मी इतिहास आणि पॉलिटिकल सायन्समध्ये डिग्री घेतली आहे. त्यामुळे भविष्यात मला राजकारणात उतरायला आवडेल. पण हा कोणताही बॅकअप प्लान नाही. मी ही इंडस्ट्री सोडून चालले नाही. जर इथल्या लोकांनी मला काम करण्याची संधी दिली तर जितका जास्त काळ या इंडस्ट्रीमध्ये मला घालवता येईल तितका मी घालवेन' असे सारा म्हणाली होती.
वाचा: ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमासाठी प्रविण तरडेची खास पोस्ट

१९९१ च्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधी यांच्या आग्रहास्तव सारा अली खानचे आजोबा , भारतीय क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन मन्सूर अली खान पतौडी हे कॉंग्रेसच्या तिकीटावर भोपाळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढले होते. परंतु या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्या निवडणुकीत पतौडी यांना 206738 मते मिळाली होती. तर भाजप उमेदवार सुशील वर्मा यांना 308946 मते मिळवून ते विजयी झाले होते.

Whats_app_banner