Sara Ali Khan in Koffee With Karan: तू शुभमनला डेट करते?; हसत सारा अली खान म्हणाली...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sara Ali Khan in Koffee With Karan: तू शुभमनला डेट करते?; हसत सारा अली खान म्हणाली...

Sara Ali Khan in Koffee With Karan: तू शुभमनला डेट करते?; हसत सारा अली खान म्हणाली...

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Nov 06, 2023 02:00 PM IST

Koffee With Karan 8 Promo: करण जोहरने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर कॉफी विथ करण ८च्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सारा शुभमन गिलविषयी बोलतना दिसत आहे.

Sara Ali Khan in Koffee With Karan
Sara Ali Khan in Koffee With Karan (HT)

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरचा लोकप्रिय शो 'कॉफी विथ करण ८' हा चर्चेत आहे. या शोच्या प्रत्येक भागात कोणते कलाकार दिसणार असा प्रश्न सर्वांना पडतो. या शोच्या आगामी भागात अभिनेत्री सारा अली खान हजेरी लावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी सारा खासगी आयुष्यावर बोलताना दिसत आहे.

करण जोहरने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'कॉफी विथ करण ८'च्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता अनन्या पांडे एकत्र दिसणार आहेत. करण दोघींनाही त्यांच्या लव्ह लाइफविषयी प्रश्न विचारत असल्याचे प्रोमोमध्ये दिसत आहे. प्रोमोमध्ये करण साराला विचारतो की, "तुझ्या आणि शुभमन गिलच्या डेटिंगबद्दल खूप अफवा पसरत आहेत." यावर उत्तर देताना सारा अली खानला हसू येते. ती म्हणते, "सारा का सारा.. दुनिया गलत सारा के पीछे पडा है." त्यानंतर सर्वांनाच हसू अनावर होते.
वाचा: चैत्या आणि मयूच्या भांडणात नेमकं काय झालं? नागराज मंजुळेंच्या 'नाळ २'चा ट्रेलर प्रदर्शित

साराने दिलेल्या उत्तरावरून नेटकऱ्यांनी अनेक तर्क वितर्क लावण्यास सुरुवात केली आहे. शुभमन गीलचे नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत जोडले गेले होते. सारा तेंडुलकर आणि शुभमनला अनेकवेळा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. त्याचे व्हिडिओ आणि फोटोही खुप व्हायरल झाले होते. आता सारा अली खानच्या वक्तव्यानंतर शुभमन खरच सारा तेंडुलकरला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे.

सारा अली खान विषयी बोलायचे झाले तर ती गेल्या काही दिवसांपासून अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर साराने प्रतिक्रिया देत या चर्चांना पूर्णविराम दिला. साराच्या कामाविषयी बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वीच तिचा 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटात सारासोबतच विकी कौशल, राकेश बेदी, शारीब हाश्मी, नीरज सूद या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. याआधी साराचे 'अतरंगी रे', 'केदारनाथ', 'लव्ह आज कल', 'कुली नंबर 1', 'गॅसलाइट' हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले.

Whats_app_banner