सध्या सगळीकडे गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे. अनेकांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. देशभरात गणेश चतुर्थी साजरी होत असली तरी मुंबईत मात्र या सणाविषयी एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. प्रत्येकजण आपापल्या घरी बाप्पाचे स्वागत करतो. यामध्ये बॉलिवूड कलाकारही मागे नाहीते. सैफ अली खानची मुलगी सारा अली खान देखील दरवर्षी गणेश चतुर्थी साजरी करते. दरम्यान, साराने आपल्या घरी बाप्पाचे स्वागत केले, ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले. पण अभिनेत्रीने हे फोटो पोस्ट करताच ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
मुस्लीम असूनही सारा अली खानला हिंदू देवी-देवतांवर प्रचंड श्रद्धा आहे. केदारनाथ आणि वैष्णो देवी सारख्या तीर्थक्षेत्रांना ती अनेकदा भेट देताना दिसतात. त्याचबरोबर दरवर्षी सारा देखील गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी करते. यंदा देखील साराच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. साराने इन्स्टाग्राम अकाऊंटवर गणपतीच्या सुंदर मूर्तीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये तिने भगव्या रंगाचा एथनिक सूट परिधान केला आहे. हे फोटो शेअर करत साराने "गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा... बाप्पा आम्हा सर्वांना सुख-शांती देवो" असे कॅप्शन दिले आहे.
सारा अली खानचे गणेश चतुर्थीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. हे फोटो समोर येताच सोशल मीडियावर दोन प्रकारचे ग्रुप अॅक्टिव्ह झाले आहेत. एकीकडे तिचे चाहते साराचे भरभरून कौतुक करत आहेत, तर अनेक युजर्स तिला ट्रोल करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंट केली की, 'बॉलिवूडची सर्वात सेक्युलर हिरोईन' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने "काफिर" असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने 'तुम्ही मुस्लीम आहात याची लाज वाटते' अशी कमेंट केली आहे. चौथ्या एका यूजरने 'तुमचा फतवा निघेल' असे म्हटले आहे. अशा अनेक कमेंट करत साराला ट्रोल केले जात आहे.
वाचा: बाप्पा आणायला गेलेल्या अंकिता लोखंडेला मागावी लागली महिलेची माफी, नेमकं काय घडलं होतं?
सारा अली खानने २०१८मध्ये 'केदारनाथ' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटातून या अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं होतं. त्यामुळेच अभिनेत्रीला लगेच एकामागून एक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. यानंतर सारा अली खानने कधीही मागे वळून पाहिले नाही. आपल्या छोट्याशा कारकिर्दीत तिने अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केले आणि हिट चित्रपट दिले. आजघडीला सारा अली खान स्वत: लक्झरी आयुष्य जगते. हे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल की, लहान वयात सारा अली खान जवळपास ४१ कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण बनली आहे.