'केदारनाथ' या २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे सारा अली खान. साराला पहिल्याच चित्रपटातून रातोरात स्टार बनवले. पण त्यानंतर साराचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करताना दिसला नाही. असे असूनही साराने आता अंधेरीमध्ये दोन ऑफिस खरेदी केले आहेत. हे ऑफिस अतिशय मोक्याच्या ठिकाणी असून त्यांची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
अभिनेत्री सारा अली खान आणि तिची आई अमृता सिंह यांनी मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे दोन व्यावसायिक कार्यालयांची जागा खरेदी केली आहे. FloorTap.comने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी पश्चिमेकडील वीरा देसाई रोडवरील सिग्नेचर बिल्डिंग नावाच्या इमारतीत वीर सावरकर प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून दोन कार्यालयांची जागा खरेदी केली आहे. ही दोन्ही कार्यालये नवव्या मजल्यावर आहेत. या दोन्ही कार्यालयांची किंमत २२. २६ कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे.
एका कार्यालयासाठी साराने ११ कोटी १३ लाख रुपये करारमूल्य भरले आहे. तसेच ६६.७ लाख रुपये स्टॅम्पड्यूटी भरली आहे. यामधील प्रत्येक कार्यालयाचा बिल्टअप एरिया २०९९ चौरस फूट आणि कार्पेट एरिया १९०५ चौरस फूट आहे. या कार्यालयांची नोंदणी १० ऑक्टोबर २०२४ रोजी करण्यात आली होती. या कार्यालयांसोबत तीन गाड्यांचे पार्किंग देण्यात आले आहे.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात साराने आपल्या आईसोबत याच इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ऑफिस युनिट खरेदी केले होते. हा व्यवहार ९ कोटी रुपयांचा होता आणि तिने ४१.०१ लाख रुपये स्टॅम्पड्यूटी भरली होती. हा करार कार पार्किंगच्या तीन जागांसह झाला होता. या मालमत्तेची विक्री ऐश्वर्या प्रॉपर्टी अँड इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेडने केली होती.
वाचा : तू हॉटेलमध्येच गाणे गा ; अरिजीत सिंहची नक्कल करणाऱ्या स्पर्धकावर संतापला विशाल दादलानी
अमिताभ बच्चन यांनी गेल्या वर्षी याच टॉवरच्या २१ व्या मजल्यावरील चार ऑफिस यूनिट्स खरेदी केले होते. या यूनिटची प्रत्येकी ७.१८ कोटी रुपये किंमत होती. या चारही युनिट्सचा एकत्रित कार्पेट एरिया ७,६२० चौरस फूट आहे. १ सप्टेंबर रोजी या व्यवहाराची नोंदणी झाली तेव्हा बिग बींनी १.७२ कोटी रुपये स्टॅम्प ड्यूटी भरली होती.
संबंधित बातम्या