Happy Birthday Sara Ali Khan: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आज (१२ ऑगस्ट) तिचा २९वा वाढदिवस साजरा करत आहे. ती बॉलिवूडची एक आघाडीची अभिनेत्री आहे, जी तिच्या सुंदर शैलीने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. बॉलिवूडच्या या दिवाचा जन्म १२ ऑगस्ट १९९५ रोजी झाला होता. सारा ही अभिनेत्री अमृता सिंह आणि अभिनेता सैफ अली खान खान यांची मोठी मुलगी आहे. या अभिनेत्रीने फार कमी कालावधीत इंडस्ट्रीत वेगळे स्थान निर्माण केले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने फार कमी काळातच इंडस्ट्रीत एक यशस्वी अभिनेत्री म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. आतापर्यंत तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, अभिनेत्री तिच्या साधेपणासाठी देखील ओळखली जाते. ती अनेकदा सर्वसामान्यांप्रमाणे ऑटोमध्ये फिरताना दिसते. पण, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, साधे जीवन जगणाऱ्या पतौडी कुटुंबातील लेकीने स्वतःच्या बळावर करोडोंची संपत्ती जमा केली आहे. तिची एकूण संपत्ती किती आहे, ते जाणून घेऊया...
सारा अली खानने २०१८मध्ये 'केदारनाथ' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटातून या अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं होतं. त्यामुळेच अभिनेत्रीला लगेच एकामागून एक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. यानंतर सारा अली खानने कधीही मागे वळून पाहिले नाही. आपल्या छोट्याशा कारकिर्दीत तिने अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केले आणि हिट चित्रपट दिले. आजघडीला सारा अली खान स्वत: लक्झरी आयुष्य जगते. हे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल की, लहान वयात सारा अली खान जवळपास ४१ कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण बनली आहे.
सारा अली खानच्या चित्रपटांच्या फीबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री एका चित्रपटासाठी तब्बल ५ ते ७ कोटी रुपये इतकी मोठी फी घेते. एवढेच नाही, तर साराने आपल्या मेहनतीने मुंबईत स्वत:चे एक आलिशान घरही खरेदी केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची किंमत जवळपास १.५ कोटी रुपये आहे. साराला महागड्या कारचीही खूप आवड आहे. सारा अली खानच्या गॅरेजमध्ये मर्सिडीज-बेंझ जी-क्लास ३५०डी सारख्या अनेक लक्झरी कार आहेत. त्यांची किंमतही कोटींच्या घरात आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सारा अली खान शेवटची विकी कौशलसोबत 'जरा हटके जरा बचके' चित्रपटात दिसली होती.