Sara Ali Khan: विकी कौशलसह सारा अली खान पोहोचली अजमेर शरीफ दर्ग्यावर! १८५ सदस्यांच्या कुटुंबाची घेतली भेट!
Sara Ali Khan At Ajmer Sharif Dargah: ‘जरा हटके जरा बचके’ या त्यांच्या आगामी चित्रपटाला यश मिळावं, यासाठी प्रार्थना करण्यासाठी ते अजमेर शरीफ दर्ग्यावर पोहोचले होते.
Sara Ali Khan At Ajmer Sharif Dargah: बॉलिवूड सेलिब्रिटी विकी कौशल आणि सारा अली खान रविवारी संध्याकाळी अचलक अजमेर सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांच्या दर्ग्यावर पोहोचले. या दोन्ही कलाकारांनी या ठिकाणी झियारत केली आणि मजार शरीफवर मखमली चादर अर्पण केली. ‘जरा हटके जरा बचके’ या त्यांच्या आगामी चित्रपटाला यश मिळावं, यासाठी प्रार्थना करण्यासाठी ते अजमेर शरीफ दर्ग्यावर पोहोचले होते. दर्ग्याचे खादिम मोहम्मद साकी यांनी त्यांना जियारत करायला लावली व तब्रुक सादर केले.
ट्रेंडिंग न्यूज
सारा अली खान आणि विकी कौशल या आपल्या लाडक्या कलाकारांना पाहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती. चाहत्यांच्या प्रचंड गराड्यात हे दोन्ही कलाकार बराच वेळ अडकले होते. मात्र, या गर्दीतून देखील ते दर्ग्यापर्यंत पोहोचले. यानंतर अस्तानामध्ये व्हरांड्यावर बसून सारा अली खानने काही वेळ प्रार्थना केली. त्याच्या आगामी 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटासाठी दोघांनी प्रार्थना केली. कुणालाही कुणकुण लागू नये म्हणून हे कलाकार ऑटो रिक्षाने दर्गा शरीफ येथे पोहोचले होते. मात्र, तरीही लोकांनी त्यांना ओळखले.
Mukta Barve: नाट्यगृहांची वाईट अवस्था दाखवणाऱ्या कलाकारांनंतर आता मुक्ता बर्वेचा व्हिडीओ होतोय व्हायरल!
विकी कौशल आणि सारा अली खान याआधी त्यांच्या 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाच्या निमित्ताने जयपूरला आले होते. तेथून ते दुपारी ४ नंतर अजमेरला रवाना झाले होते. या ठिकाणी ते थेट दर्ग्यात पोहोचले होते, जिथे त्यांनी या चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली. यानंतर ते अजमेरच्या रामसर गावातही पोहोचले. याठिकाणी गावातील लोकांनी दोघांचे पगडी आणि हार घालून स्वागत केले. यावेळी दोघेही १८५ लोकांच्या मोठ्या कुटुंबाला भेटण्यासाठी येथे आले होते.
विकी आणि सारा यांनी यावेळी रामसर गावाला भेट देत या गावातील सगळ्यात मोठ्या कुटुंबाला भेट दिली. या मोठ्या कुटुंबात एकूण १८५ सदस्य आहेत. नशिराबाद उपविभागातील गावात हे कुटुंब राहते. सर्वजण या घरात खूप आनंदाने एकत्र राहतात. या कुटुंबाचे प्रमुख म्हणजे भंवरलाल माळी हेच या घरातील सर्वात महत्त्वाचे निर्णय घेतात. या घरातील कुटुंबासाठी दररोज ७५ किलो पिठाच्या रोट्या बनवल्या जातात. एकूण १० चुलींवर रोट्या तयार केल्या जातात. याच मोठ्या कुटुंबाची भेट त्यांनी घेतली आहे.