Ae Watan Mere Watan Review: नुकताच अभिनेत्री सारा अली खान हिचा 'ए वतन मेरे वतन' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता होती. त्यातच हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाल्याने घरबसल्या नवा कोरा चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली आहे. आता सगळेच प्रेक्षक घरी बसून आपल्या कुटुंबासोबत सारा अली खानचा हा नवा चित्रपट पाहू शकता. तुम्ही देखील वीकेंडला हा चित्रपट पाहण्याचा प्लॅन करत असाल, तर जाणून घ्या कसा आहे हा नवाकोरा चित्रपट...
हिंदी चित्रपटसृष्टीत भारताच्या स्वातंत्र्य लढ्यावर आधारित अनेक चित्रपट बनवण्यात आले आहेत. अनेक चित्रपटांमधून क्रांतिकारकांचे धाडस आणि स्वातंत्र्यासाठीची त्यांची तळमळ मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आली आहे. आता अशीच एक कथा ओटीटी प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडीओवर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या आली आहे, ज्यामध्ये क्रांतिकारकांच्या एका कृतीने ब्रिटीश सरकारला कसा धक्का बसतो आणि त्यानंतर ते नवनवीन डावपेच अवलंबतात, ते पाहायला मिळणार आहे. मात्र, स्वातंत्र्य मिळवण्याची प्रबळ इच्छा आणि धैर्य यापुढे ब्रिटीशांचे कोणतेच डावपेच चालत नाहीत.
या चित्रपटात १९४२ सालच्या ‘भारत छोडो आंदोलना’ची कथा दाखवण्यात आली आहे. ‘भारात छोडो आनंदोलन’ सुरू असताना ते थांबवण्यासाठी इंग्रजांनी गांधी आणि नेहरूंनाच नव्हे, तर काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांना तुरुंगात टाकले. इतकेच नाही, तर त्यांनी पक्षावर बंदीही घातली. परंतु, याचा क्रांतिकारकांवर काहीही परिणाम झाला नाही आणि त्यांनी आपला लढा सुरूच ठेवला.
‘भारत छोडो आनंदोलाना’च्या वेळी, क्रांती लढ्यात सहभागी झालेल्या एक तरुण क्रांतिकारी उषा मेहता (सारा अली खान) एक अतिशय महत्त्वाची जबाबदारी पार पाडतट आणि तुरुंगात असलेल्या लोकांचा आवाज रेडिओद्वारे देशभर पोहोचवतात. क्रांतिकारकांची हीच कृती इंग्रज शासकांच्या तोंडावर दिलेली एक चपराक आहे. या खवळलेले ब्रिटीश सरकार पुढे काय करते, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल.
जेव्हा प्रेक्षक म्हणून तुम्ही सारा अली खान हिचा हा चित्रपट पाहाल, तेव्हा काही सीन्सनंतरच तुमच्या लक्षात येईल की, या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने आपापल्या व्यक्तिरेखेशी चांगलेच जुळवून घेतले आहे. प्रत्येक कलाकाराने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. ज्याप्रमाणे एखादा सैनिक आपल्या देशासाठी प्राणांची आहुती देण्यास मागेपुढे पाहत नाही, त्याचप्रमाणे या चित्रपटातील प्रत्येकाने आपापल्या भूमिकेसाठी मेहनत घेतली आहे. एकंदरीतच सगळ्यांनीच आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे.
चित्रपट: ए वतन मेरे वतन
दिग्दर्शक: कानन अय्यर
कलाकार: सारा अली खान, इमरान हाश्मी, स्पर्श श्रीवास्तव, बेनेट लिंटन, आर भक्ती क्लेन, आनंद तिवारी, एलेक्स ओ'नेल
संबंधित बातम्या