सध्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. अनेक कलाकार एकापाठोपाठ एक लग्न करत आहेत. तितीक्षा तावडे-सिद्धार्थ बोडके, शिवानी सुर्वे-अजिंक्य ननावरे यांच्या पाठोपाठ आता छोट्या पडद्यावरील ‘जीव माझा गुंतला’ मालिकेतील अभिनेत्याने देखील लग्न केले आहे. अभिनेता सौरभ चौघुले आणि योगिता चव्हाण यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यापाठोपाठ आता त्यांच्या लग्नातील उखाणा घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
फेब्रुवारी महिन्यात अभिनेता सौरभ चौघुले आणि अभिनेत्री योगिता चव्हाण यांनी फेब्रुवारी महिन्यात गुपचूप साखरपुडा उरकला होता. त्यानंतर आता मार्च महिन्यात ते दोघे विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वामधील अनेक कलाकार उपस्थित होते. सौरभ आणि योगिता यांच्या लग्नाची बरीच चर्चा रंगली होती. त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
वाचा: प्रेक्षकांना कसा वाटला अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा 'बडे मियां छोटे मियां' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
लग्नानंतर सौरभ आणि योगिताने राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये सौरभने मालवणी भाषेत उखाणा घेतला आहे. “शेजाऱ्यांच्या कलमाक धरलो आंबो जून, चव्हाणांच्या चेडवाक केलंय चौघुलेंची सून” असा उखाणा सौरभने घेतला. तो ऐकून योगिता देखील शांत बसली नाही. तिने देखील सौरभला टक्कर देण्यासाठी उखाणा घेतला. “जागोजागी होई मला याचेच भास, सौरभचं नाव घेऊन भरवते चीज केकचा घास” असा उखाणा योगिताने केला. सौरभ आणि योगिताने घेतलेले उखाणे सध्या चर्चेत आहेत.
वाचा: ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सलमान खान याच्या घराबाहेर जमलेल्या चाहत्यांवर लाठीचार्ज
‘जीव माझा गुंतला’ या मालिकेच्या सेटवर योगिता आणि सौरभची पहिली भेट झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये चांगले मैत्रिचे नाते होते. हळूहळू त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. ऑनस्क्रीन अंतरा-मल्हारच्या जोडीने खऱ्या आयुष्यात देखील एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यांची लव्हस्टोरी जवळपास सर्वांनाच माहिती होती. आता ते दोघे लग्नबंधनात अडकल्याचे कळताच सर्वांना आनंद झाला आहे. ३ मार्च रोजी योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामात पार पडला. त्यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ पाहून अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
वाचा: 'आजकाल केवळ दिखावा आणि फायद्यासाठी कलाकार लग्न करत आहेत', नोरा फतेही हिचे खळबळजनक विधान
संबंधित बातम्या