मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sanya Malhotra: दिल्ली मेट्रोमध्ये सान्या मल्होत्राची छेडछाड; आपबिती सांगताना अभिनेत्री म्हणाली...

Sanya Malhotra: दिल्ली मेट्रोमध्ये सान्या मल्होत्राची छेडछाड; आपबिती सांगताना अभिनेत्री म्हणाली...

May 24, 2023 09:48 AM IST

Sanya Malhotra : ‘दंगल गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिने नुकत्याच एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेला एक भयानक प्रसंग सांगितला आहे.

Sanya Malhotra
Sanya Malhotra

Sanya Malhotra : ‘दंगल गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिने नुकत्याच एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेला एक भयानक प्रसंग सांगितला आहे. सान्या मल्होत्रा कॉलेजमध्ये असताना तिला या वाईट घटनेचा सामना करावा लागला आहे. कॉलेजमधून घरी जात सान्या दिल्ली मेट्रोमध्ये चढली होती. तिच्यासोबत काही मुले देखील मेट्रोमध्ये शिरली. सान्याच्या म्हणण्यानुसार, या मुलांनी तिचा विनयभंग केला आणि तिला चुकीचा स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. परंतु, मेट्रोमध्ये कोणीही तिच्या मदतीला आले नाही.

ट्रेंडिंग न्यूज

आपली आपबिती सांगताना सान्या म्हणाली की, तो काळ माझ्यासाठी खूपच भीतीदायक होता. सान्या मेट्रोतून बाहेर पडल्यानंतरही मुलं तिच्या मागे लागली. मात्र, सान्याने स्वतःची कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली. अभिनेत्री सान्या मल्होत्रा नुकतीच 'कटहल' चित्रपटात झळकली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानच सान्याने स्वतःवर बेतलेला हा प्रसंग सांगितला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने ही आपबिती सांगितली आहे.

Akshay Kumar Video: अक्षय कुमार भोलेबाबाच्या चरणी लीन; केदारनाथमध्ये जाऊन घेतलं महादेवाचं दर्शन!

आपल्यावर बेतलेल्या या प्रसंगाबद्दल बोलताना सान्या म्हणाली, ‘मी एकटी होते आणि मला असहाय्य वाटले. अशा स्थितीत माणूस काही करू शकत नाही. अशा घटनांनंतर लोक सहसा म्हणतात की, तुम्ही काहीच का केले नाही. मात्र, अशा वेळी माणसाचे हात-पाय कापू लागतात, हे त्यांना माहीत नसते. आपण फक्त कोणत्याही प्रकारे या परिस्थितीतून सुटू इच्छित असतो. मात्र, मला यावेळी कुणीच मदतीला आलं नाही.'

ती पुढे म्हणाला की, 'मी राजीव चौकातून बाहेर आले, तेव्हा ती मुलं तिथेही माझ्या मागे येऊ लागली. ती मुलं दिसायला उंच आणि रुंद शरीर, अशी एकदम बॉडी बिल्डर टाईपची होती. सुदैवाने रस्त्यावर गर्दी होती. मी पटकन जवळच्या वॉशरूममध्ये गेले आणि माझ्या वडिलांना फोन केला. त्यांना लगेच तिथे यायला सांगितले. असाच एक अनुभव तिचा स्टार बनल्यानंतरही आला होता. एका चाहत्याने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता.

सान्या म्हणाली की, स्टार बनल्यानंतरही तिने अशा परिस्थितींचा सामना केला होता. काही वर्षांपूर्वी देखील तिच्यासोबत अशीच एक घटना घडली होती. एक चाहता फोटो क्लिक करायला आला तेव्हा, त्याने थेट तिच्या कंबरेवर हात ठेवला होता. त्यावेळेस देखील सान्या घाबरली होती. मात्र, त्यावेळी तिने हिम्मत करून या परिस्थितीठी त्या व्यक्तीला खडे बोल सुनावले.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग