अभिनेता संतोष जुवेकर देणार पाठीराखा बनून इंदूची साथ! 'इंद्रायणी' मालिका रंजक वळणावर
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अभिनेता संतोष जुवेकर देणार पाठीराखा बनून इंदूची साथ! 'इंद्रायणी' मालिका रंजक वळणावर

अभिनेता संतोष जुवेकर देणार पाठीराखा बनून इंदूची साथ! 'इंद्रायणी' मालिका रंजक वळणावर

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 08, 2024 08:23 AM IST

'इंद्रायणी' या मालिकेत नुकताच एका नव्या पात्राची एण्ट्री झाली आहे. हा अभिनेता संतोष जुवेकर आहे.

santosh juvekar: 'इंद्रायणी' मालिका रंजक वळणावर
santosh juvekar: 'इंद्रायणी' मालिका रंजक वळणावर

मालिका विश्वात अनेक वेगवेगळ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात. त्यामध्ये काही दिवसांपूर्वी कलर्स मराठी वाहिनीवरील 'इंद्रायणी' ही मालिका देखील आहे. या मालिकेने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडलीय या मालिकेतील इंदूची कथा दाखवण्यात आली आहे. ही इंदू म्हणजेच बालकलाकार सांची भोईर सर्वांची मने जिंकत आहे. तसेच अभिनेत्री अनिता दाते आणि संदीप पाठक देखील या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आता या मालिकेत एका नव्या पात्राची एण्ट्री झाली आहे.

'इंद्रायणी' मालिकेत रंजक वळण

'इंद्रायणी' ही मालिका आता रंजक वळणावर आली आहे. इंदू सध्या दिग्रसकर वाड्यात राहायला गेली असून तिथे ती प्रत्येक कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. तर दुसरीकडे इंदूच्या सतत पाठीशी असलेले तिचे लाडके व्यंकू महाराज यांची प्रकृती बिघडत चालली आहे. इंदूला महाराजांची खूप काळजी वाटत आहे. एका साधू बाबांनी सांगितल्या प्रमाणे इंदूला व्यंकू महाराजांना वाचवण्याकरता मोठी कसोटी पार करावी लागणार आहे.
वाचा: कलाला कळाली आई-वडिलांची बिकट परिस्थिती, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत आजच्या भागात काय घडणार?

इंदूची खरी परिक्षा

१० जूनपासून इंदूचा नवीन प्रवास सुरू होणार. साधू बाबांनी इंदूला जी संजीवनी सांगितली होती इंदू आता त्याच संजीवनीच्या शोधात आळंदीला जाण्याचे ठरवते. पण तिने निवडलेला हा प्रवास खूपच खडतर असणार यात काही शंका नाही. पैसे अपुरे असताना आणि कसली माहिती नसताना तिचा हा आळंदीचा प्रवास कसा होईल. याशिवाय तिच्या या खडतर प्रवासात पाठीराखा म्हणून साथ देणाऱ्या व्यक्तीची भूमिका संतोष जुवेकर साकारणार आहेत. आता हे दोघे मिळून हा प्रवास कसा पार पाडणार आहेत, या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
वाचा: 'आई कुठे काय करते' मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्याची एण्ट्री, चाहत्यांनी व्यक्त केला आनंद

नव्या पात्राची एण्ट्री

'इंद्रायणी' या मालिकेतील इंदूची जबरदस्त इच्छाशक्ती आणि तिचा हा आळंदीचा खडतर प्रवास इंदूला व्यंकू महाराजांसाठी संजीवनी मिळवून देईल?? तिचं आराध्य दैवत असलेले श्री विठूमाऊली तिला कशी कशी साथ करतील? असे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. येत्या काळात त्यांना या प्रश्नाची उत्तरे येत्या काळात मिळतील.
वाचा: अमिताभ हे रेखासोबत काम करु शकतात का? जया बच्चन यांनी दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष

Whats_app_banner