मराठी इंडस्ट्रीमधील रावडी अभिनेता म्हणून संतोष जुवेकर ओळखला जातो. 'झेंडा' या चित्रपटातील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. आता सध्या संतोष एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये संतोष एकदम रानटी लूकमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पण त्याचा हा रानटी लूक नेमका कशासाठी आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
संतोष जुवेकर हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. तो सतत त्याच्या आयुष्यातील गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतो. सध्या सोशल मीडियावर संतोषचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये त्याचा पाय मोडला आहे, हातात तलवार आहे, केसांचे टक्कल केले आहे. या टपोरी लूकमधील फोटो संतोषने नेमका का शेअर केला आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. हा फोटो शेअर करत संतोषने 'मैत्रीसाठी जीव घेणारा रानटी मित्र!' असे कॅप्शन दिले आहे. खरंतर संतोषचा 'रानटी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या फोटोमध्ये त्याने केलाला लूक हा आगामी चित्रपटातील असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘रानटी’ या चित्रपटात दोन जिगरी मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात संतोष जुवेकर हा अभिनेता शरद केळकरच्या बालपणीच्या मित्राची भूमिका साकारणार आहे. या जिगरी मित्राचे नाव बाळा असे आहे. ‘बाळा’च्या भूमिकेसाठी त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, मेकअपच्या साथीने भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी संतोषने घेतलेली मेहनतही नक्कीच मोलाची ठरते. या गेटअप मध्ये धावण्यापासून ते अगदी अॅक्शन सीन करण्यापर्यंतची मेहनत घेत ही भूमिका संतोषनी साकारली आहे. या वेगळ्या भूमिकेचं आव्हान स्विकारत संतोषनी घेतलेली मेहनत ‘रानटी’ चित्रपटात दिसून येणार आहे.
‘रानटी’ या चित्रपटात शरद केळकर हा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत संतोष जुवेकर दिसणार आहे. इतर कोणते कलाकार दिसणार याविषयी माहिती समोर आलेली नाही. समित कक्कडने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. येत्या २२ नोव्हेंबरला हा अॅक्शनपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
वाचा: भर मांडवात राणी मुखर्जीवर चिडली काजोल, फटका मारतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल
संतोषने रानटी चित्रपटातील बाळा या भूमिकेसाठी विशेष मेहनत घेतली आहे. त्याविषयी बोलताना संतोष म्हणतोय की, "कोणतीही भूमिका एकरूप होऊन केली की ती प्रेक्षकांपर्यंत सहजपणे पोहोचते, दिग्दर्शक समित कक्कड कडून मला नेहमी माझ्यातल्या अभिनयाला वाव देणाऱ्या भूमिका ऑफर झाल्या आहेत. त्याच्या चित्रपटात काम करण्यासाठी माझा उत्साह व्दिगुणीत होतो. भूमिकेचे सोने करण्यासाठी मी वाट्टेल ती मेहनत घेतो. ‘रानटी’ चित्रपटातील माझी ही खलनायकी भूमिका प्रेक्षकांना ‘बाळा’च्या प्रेमात पाडेल."
संबंधित बातम्या