मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता म्हणून संतोष जुवेकर ओळखला जातो. त्याने छोट्या पडद्यावरील मालिका तसेच चित्रपटांमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. संतोषचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. नुकताच संतोषने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एका सलूनच्या बाहेर स्वत:चा फोटो पाहून लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्याचे म्हटले आहे.
संतोष जुवेकर हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सतत सोशल मीडियावर त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सच्या शुटिंगचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. नुकताच शुटिंगला निघालेल्या संतोषला प्रवासादरम्यान एक सलून दिसले. या सलूनच्या होर्ड़ींगवर त्याचा फोटो होता. हा फोटो पाहून संतोष भारावून गेला आहे. या सलूनचा फोटो शेअर करत त्याने बालपणीच्या आठवणी शेअर केल्या आहेत.
वाचा: चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर कमल हासन यांच्या लेकीचा ब्रेकअप, काय आहे कारण?
संतोषने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'जय महाराष्ट्र हेअर ड्रेसर्स' असे लिहिलेले एक होर्डींग शेअर केले आहे. या होर्डींगवर त्याचा फोटो आहे. हा फोटो शेअर करत त्याने, "लहानपणी बाबा सलूनमध्ये केस कापायला घेऊन जायचे तेव्हा केस कपणारे उत्तम काका मला त्यांच्या दुकानातल्या भिंतीवर लावलेल्या अनेक हिरोंचे फोटो दाखवून विचारायचे, 'बाळा बोल कुणासारखे कापू केस तुझे.... अमिताभ बच्चन सारखे की मिथुन सारखे की अनिल कपूर सारखे की शाहरुख खान सारखे की सलमान खान सारखे............. आणि मग त्यातला मी एक फोटो निवडायचो आणि सांगायचो. पण ते कापायचे तसेच जसे बाबा त्यांना सांगायचे (दोघ मिळून या लहान जीवाला चु....... बनवायचे ) असे म्हटले आहे.
वाचा: ‘आमच्या पप्पांनी गंपती आणला’ गाण्यामधील चिमुकला साईराज याचे नशीब फळफळले! दिसणार 'या’ मालिकेत
पुढे तो म्हणाला, "असो ते महत्वाचं नाही तर सांगायचे कारण हे की काल शुटला जाताना अचानक मला रस्त्यात एक केश करतनालाय (सलून, hair dresser's )चे दुकान दिसलं आणि त्याच्या नावाच्या बोर्डवर चायला चक्क माझा फोटो लावला होता. त्या भावना आता बहुतेक पोर दुकानात जाताना बाहेरच ठरवत असतील कुणासारखे केस कापायचे ते. ये बाप्पू...... साल्ला अपून तो हिरो बनगया!!!! बोला तो बोला.. जय महाराष्ट्र."
वाचा: अमिताभ बच्चन यांचं शेजारी व्हायचंय? मोजावी लागणार मोठी किंमत! जाणून घ्या काय आहे नेमकी भानगड
सोशल मीडियावर संतोष जुवेकरची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. एका यूजरने 'अरे मस्त... एकेकाळी अमिताभ आणि राजेश खन्ना फोटो असायचे आता तुझे' अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'मराठी हिरोंचे फोटो क्वचितच ठेवत असतील. पण भारी वाटलं संत्या भाईचा फोटो बघून' अशी कमेंट करत संतोषचे कौतुक केले आहे.
संबंधित बातम्या