Santosh Juvekar: खूप दिवस एकट्याने वाट पाहिली, आता...; संतोष जुवेकरची पोस्ट चर्चेत
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Santosh Juvekar: खूप दिवस एकट्याने वाट पाहिली, आता...; संतोष जुवेकरची पोस्ट चर्चेत

Santosh Juvekar: खूप दिवस एकट्याने वाट पाहिली, आता...; संतोष जुवेकरची पोस्ट चर्चेत

Aarti Vilas Borade HT Marathi
Updated Oct 25, 2022 11:46 AM IST

Santosh Juvekar Post: संतोष जुवेकरची ‘ती’ पोस्ट सध्या चर्चेत आहे.

संतोष जुवेकर
संतोष जुवेकर (HT)

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर. तो चित्रपटातील त्याच्या भूमिकांमुळे नेहमी चर्चेत असतो. लवकरचा त्याचा '36 गूण' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत. दरम्यान, संतोषची एक पोस्ट सध्या चर्चेत आहे.

सध्या सर्व कलाकार सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. संतोष जुवेकरने देखील शुभेच्छा देत पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने सर्वांची मने जिंकली आहेत. या पोस्टमध्ये ३६ असा आकडा लिहिण्यात आला आहे. त्याच्या आजूबाजूला अनेक कलाकारांची बोट पाहायला मिळत आहेत.
वाचा: २० वर्षांनंतर मलायकाने का घेतला घटस्फोट? जाणून घ्या कारण

काय आहे संतोष जुवेकरची पोस्ट?

“उपकार नको आणि भोचकपणा अजिबातच नको.

जर आवडलं तरच शाब्बास म्हणा आणि नाही आवडलं तर………

मी पुन्हा प्रयत्न करेन आणि करत राहीन,

तुम्हाला मी आवडण्यासाठी.

तुम्ही फक्त माझ्या सोबत रहा.

खूप दिवस एकट्याने वाट पाहिली, आता तुम्ही साथ दिलीत तर सगळंच सार्थकी लागेल.

देणार ना साथ?

चला धमाका करूयात.

शुभ दीपावली तुम्हाला, लव्ह यू रे”, अशी पोस्ट संतोष जुवेकरने केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

सध्या संतोषचा ३६ गूण हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात संतोषसोबत अभिनेत्री पूर्वा पवार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. समित कक्कड दिग्दर्शित हा चित्रपट लग्न, प्रेम आणि लिव्ह इन रिलेशनशिपवर भाष्य करणारा आहे.

Whats_app_banner