Santosh Juvekar New Car : 'झेंडा', 'रेगे','मोरया'सारख्या दमदार मराठी चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर. त्याने मराठी मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. लाखो मुलींच्या मनावर राज्य करणारा संतोष हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने नवी गाडी खरेदी केली असून ती आई-वडिलांना गिफ्ट म्हणून दिली आहे.
संतोष जुवेकरने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये संतोषने नवी गाडी घेतल्याचे सांगितले आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने “सुख म्हणजे नक्की काय असतं… काय असतं पुण्य की जे… यांच्या डोळ्यात दिसत, आई बाबा आय लव्ह यू” असे कॅप्शन दिले आहे.
वाचा: बॉबी देओलने भाचीच्या लग्नात केला 'जमाल कुडू' गाण्यावर डान्स Video Viral
संतोषने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याचे आई-वडील नव्या गाडीवरचा लाल कपडा काढताना दिसत आहेत. त्यानंतर संतोषची आई गाडीतल्या गणपतीच्या मूर्तीची पूजा करताना दिसते. सध्या सोशल मीडियावर त्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. चाहत्यांसोबतच काही कलाकार मंडळींनी या फोटोवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. अभिनेता कुशल बद्रिकेने कमेंट करत 'वाव' असे म्हटले आहे. सर्वांनीच हा व्हिडीओपाहून आनंद व्यक्त केला आहे.
संतोषच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या महिन्यात त्याच्या ‘स्ट्रगलर साला सीझन ३’चा सातवा एपिसोड प्रदर्शित झाला. लवकरच त्याचा 'छावा' हा हिंदी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. संतोषने आजवर काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये ही काम केले आहे. 'डार्लिंग' चित्रपटातील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता विजय वर्मा महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट हिट ठरला होता. त्यानंतर तो ‘कुत्ते’ या चित्रपटात अभिनेते नसिरुद्दीन शहा, अर्जुन कपूर, अभिनेत्री तब्बूसह दिसला होता.
संबंधित बातम्या