मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sankarshan Karhade: ड्रायव्हर आजारी पडल्याने संकर्षण कऱ्हाडेने चालवली बस Video Viral

Sankarshan Karhade: ड्रायव्हर आजारी पडल्याने संकर्षण कऱ्हाडेने चालवली बस Video Viral

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 02, 2023 11:55 AM IST

Sankarshan Karhade Video: अभिनेते प्रशांत दामले यांनी संकर्षण कऱ्हाडेचा व्हिडीओ शेअर करत पोस्ट लिहीली आहे.

Sankarshan Karhade
Sankarshan Karhade

मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा त्याच्या भूमिकांमुळे सतत चर्चेत असतो. सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये संकर्षण चक्क बस चालवताना दिसत आहे. नेमंक असं काय झालं की संकर्षणला बस चालवावी लागली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

संकर्षण कऱ्हाडे आणि अभिनेते प्रशांत दामले यांची घट्ट मैत्री आहे. त्यांचे ‘नियम व अटी लागू’ हे नाटक सध्या गाजत आहे. या नाटकाच्या निमित्ताने ते बाहेर गेले असताना संकर्षणने बस चालवल्याचे प्रशांत दामले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.

“काल रात्री कोथरूडच्या प्रयोगाला आमचा चालक प्रवीण ह्याला बरं वाटेनासं झालं. साधारणपणे, प्रयोग १२:३०वाजका संपल्यावर आम्ही सेट भरून, जेवून पहाटे २ वाजताच्या सुमारास मुंबईकडे निघालो. पण चालक आजारी पडला म्हटल्यावर सगळचं थांबलं. पण थांबेल तो संक्या कसला. त्याने चालकाला मागे झोपवलं आणि स्वतः ड्राइवर सीटवर बसला आणि लोणावळ्यापर्यंत बस हाणली. त्याच्याकडे हेवीचा पण लायसन आहे हे कालच मला कळले. लोणावळ्याला ड्राइवर ओके आणि मग संक्या मागे जाऊन झोपला. इसको बोलता हैं जिगर नाटकाचे प्रयोग आणि बस एकाच स्पीड ने चालू आहेत,” असे प्रशांत दामले यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

प्रशांत दामले आणि संकर्षण कऱ्हाडे यांचे ‘नियम व अटी लागू’ हे नाटक चांगले गाजत आहे. या नाटकाचा प्रत्येक प्रयोग हाऊसफूल ठरत आहे. या नाटकात संकर्षण कऱ्हाडे, अमृता देशमुख व प्रसाद बर्वे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

IPL_Entry_Point