मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय कलाकारांच्या यादीमधील दोन नावे म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडे. त्या दोघांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. पण सध्या त्यांच्याविषयी एक वेगळी बातमी समोर आली आहे. दोघांचे अपहरण झाल्याचे म्हटले जात आहे. पण खरच त्यांचे अपहरण झाले आहे की हा पब्लिसिटी संट आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
झी मराठीवर ३ जूनला संध्याकाळी एक ब्रेकिंग न्यूज प्रसारित झाली होती. या न्यूजमध्ये दोन नामवंत कलाकारांच्या अपहरणाबद्दल सांगण्यात आले आहे. यामध्ये अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि अभिनेत्री अमृता खानविलकरचे अपहरण झाल्याचे सांगण्यात आले. संकर्षण एका जाहिरातीसाठी शूट करत असताना त्याला त्याचवेळी एका वाहनात टाकून नेण्यात आले. तर दुसरीकडे अमृताला आपल्या व्हॅनिटीमधून बाहेर पडताच तिचे चाहते आणि बॉडीगार्डच्या उपस्थितीत किडनॅप केले गेले.
वाचा: सहा अभिनेत्रींसोबत स्वप्नील जोशी करतोय रोमॅन्स, नेमकी काय आहे भानगड जाणून घ्या ?
अमृता आणि संकर्षणचे खरच अपहरण केले गेले आहे की हा त्यांच्या आगामी प्रोजेक्टच्या प्रमोशनचा फंडा आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे. ते दोघे एकत्र एका चित्रपटामध्ये दिसणार आहेत की त्यांची मालिका येणार आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. येत्या काळात याविषयी माहिती मिळेल अशी अपेक्षा प्रेक्षकांना आहे.
वाचा: मल्लिकाजान पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नेटफ्लिक्सने केली 'हिरामंडी २'ची घोषणा
एका यूजरने 'उत्सुकता वाढवणारे आहे' अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'आम्ही वाट पाहातोय' असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने 'ड्रामा ज्युनिअर' असे म्हटले आहे. तर चौथ्या एका यूजरने 'काहीही बकवास' म्हणत प्रोमोवर टीका केली आहे.
वाचा: सलमान खानशी लग्न करायला फार्म हाऊसमध्ये शिरली २४ वर्षांची तरुणी! पुढं काय झालं पाहा!
अमृता काही दिवसांपूर्वी लुटेरे या वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. तिच्या या सीरिजची बरीच चर्चा रंगली. त्यानंतर तिचा ‘पठ्ठे बापूराव’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच आता झी मराठीवर तिचा नवा कार्यक्रम येत असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकर्षण कऱ्हाडे करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
संबंधित बातम्या