‘हम साथ साथ है’ आणि ‘हम आपके है कौन’ या सुपरहिट चित्रपटांमध्ये वडिलांची भूमिका साकारणारे अभिनेते म्हणजे आलोक नाथ. या दोन्ही चित्रपटांमधील त्यांची प्रेमळ वडिलांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली. या दोन्ही चित्रपटांनी त्यांना एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. पण आलोक नाथ यांचा इथवरचा प्रवास खडतर होता. या त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. आज १० जुलै रोजी आलोक नाथ यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी...
आलोक नाथ यांनी टीव्ही ते बॉलिवूडपर्यंत ‘संस्कारी बाबूजी’ म्हणून आपली छाप सोडली आहे. केवळ प्रेमळ वडीलच नव्हते, तर त्यांनी सर्व प्रकारच्या व्यक्तिरेखा पडद्यावर साकारल्या आहेत. मात्र, अभिनयविश्वात आलोक नाथ यांचे नाव घेतले, तर ‘बाबूजीं’ची प्रतिमाच लोकांच्या डोळ्यासमोर तरळते. आलोक नाथ यांनी केवळ बॉलिवूडच नव्हे, तर टीव्हीवर देखील वडिलांच्याच भूमिका साकारल्या होत्या. मात्र, त्यांनी रोमँटिक हिरो म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
वाचा: पावसावरील 'ती' पोस्ट अभिनेत्री सई ताम्हणकरने केली डिलिट, काय आहे नेमकं कारण?
आलोक नाथ हे मूळचे दिल्लीचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील डॉक्टर होते. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आलोक नाथ त्यांच्यात अभिनयाची गोडी वाढू लागली. याच कारणामुळे त्यांनी कॉलेजनंतर रुचिका थिएटर ग्रुपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी तीन वर्षे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अभिनायचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी मनोरंजन विश्वात दमदार पदार्पण केले.
वाचा: सलमान खानपासून रणवीर सिंगपर्यंत सेलिब्रिटींनीही अनंत-राधिकाच्या हळदीत केली धमाल
आलोक नाथ यांनी त्यांच्या कारकिर्दीत तब्बल १४०हून अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. आलोक नाथ यांना बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता. त्यांनी १९८०मध्ये ‘गांधी’ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. परंतु, या चित्रपटामध्ये त्यांची छोटीशी भूमिका असल्याने त्यांना फारशी ओळख मिळाली नव्हती. त्यानंतर आलेल्या 'कामग्नी' चित्रपटात आलोक नाथ यांनी खूप बोल्ड सीन्स दिले होते. 'हम साथ साथ है', 'हम आपके है कौन', 'परदेस', 'मैने प्यार किया', 'विवाह' यांसारख्या चित्रपटांमध्ये प्रेमळ बाबा, सासरे अशा भूमिका साकारल्या आहेत. 'सपना बाबुल का बिदाई', 'मैं रहें वाली महलों की', 'यहाँ में घर घर खेली', 'बुनियाद' यांसारख्या मालिकांमध्ये देखील ते वडिलांच्या भूमिकेत दिसले आहेत.
वाचा: या आरोपींना फाशीची शिक्षा द्या; ‘वरळी हिट अँड रन’ प्रकरणात ज्येष्ठ अभिनेत्याच्या पुतणीचा मृत्यू
संबंधित बातम्या