छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री संजीदा शेख सध्या चर्चेत आहे. या चर्चा तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केल्यामुळे सुरु झाल्या आहेत. पण संजीदाचे हे फोटो नेटकऱ्यांना रुचले नाहीत. त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. संजीदाने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तिच्या प्रतिक्रियेची सर्वजण वाट पाहात आहेत.
संजीता खान ही नुकताच जंगल सफारीला गेली होती. त्यावेळी तिने डीप नेक क्रीम रंगाचा ड्रेस घातला होता. संजीदाच्या या परिधान केलेल्या कपड्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सोशल मीडियावर संजीदाचे हे फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिला सुनावले आहे. एका यूजरने 'मॅडम ड्रेसचे बटण लावायला विसरल्या' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'असे कपडे घालून तुम्हाला काय मिळते' असा प्रश्न विचारला आहे.
वाचा: मी जिवंत आहे; 'मदर इंडिया'मधील अभिनेत्याच्या निधनानंतर दिग्दर्शक साजिद खानचा व्हिडीओ व्हायरल
संजीदाचे हे बोल्ड फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. तिच्या या फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला आहे. संजीदाने जंगल सफारीमधील आणखी काही फोटो देखील शेअर केले आहेत. तसेच एका व्हिडीओमध्ये तिच्या डोक्यावर पक्षी बसला असल्याचे दिसत आहे. एकंदरीत संजीदा जंगल सफारीचा पुरेपर आनंद घेताना दिसत आहे.
संजीदाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर ती कुठे फिरायला गेली असा प्रश्न सर्वांना पडला होता. संजीदा अभिनेता हर्षवर्धन राणेला डेट करत असल्याच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहेत. त्यामुळे काहींनी हर्षवर्धनचे अकाऊंट चेक केले. तेव्हा तो देखील जंगल सफारीला गेल्याचे स्पष्ट झाले.