मराठी फिल्म इंडस्ट्री सोबतच बॉलिवूडमध्ये ही ‘देढ फुट्या’ या भूमिकेसाठी लोकप्रिय झालेले अभिनेता म्हणजे संजय नार्वेकर. त्याच्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम व्यक्त केले आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमधील संजयचा चिडलेला अवतार पाहून प्रेक्षकांना प्रश्न पडला आहे. नेमकं सुरु काय आहे. यापूर्वी संतोष जुवेकरचा फोटो व्हायरल झाला होता. त्या फोटोमध्ये त्याचा पाय मोडलेला दिसत होता. आता संजय नार्वेकर यांच्या फोटोमागचे काय आहे सत्य? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
सध्या सोशल मीडियावर संजय नार्वेकरचे दोन फोटो व्हायरल झाले आहेत. एका फोटोमध्ये तो रागात दिसत आहे. तसेच त्याच्या हातात कोयता दिसत आहे. जणू काही संजय आता कुणावर तरी वार करणार आहे. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये त्याच्या हातात तलवार दिसत आहे. हातात सोन्याच्या अंगठ्या, गळ्यात माळ, गोल्डन घड्याळ असा संजय यांचा रावडी लूक आहे. खरंतर त्यांचा हा लूक आगामी चित्रपट 'रानटी'साठी करण्यात आला आहे.
संजय नार्वेकर आता ‘रानटी’ चित्रपटातून आपल्याला अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहेत. ‘सदा राणे’ नावाच्या खतरनाक खलनायकाची भूमिका ते साकारत आहेत. ‘सदा राणे’ ही अत्यंत क्रूर व्यक्तिरेखा प्रेक्षकांचा थरकाप उडवणारी आहे. त्यामुळे फोटोपाहून सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.
पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला सगळ्यात मोठा अॅक्शनपट २२ नोव्हेंबरला आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात संजय नार्वेकरसोबत संतोष जुवेकर देखील दिसणार आहे. आता आणखी कोणते कलाकार दिसणार याविषयी माहिती समोर आलेली नाही.
वाचा: महेश मांजरेकरांची पहिली पत्नी आहे तरी कोण? दोन्ही मुलांसोबत राहते एकटी
रावडी चित्रपटाविषयी बोलताना संजय नार्वेकर म्हणाला, "‘सदा राणे’ हा वरकरणी अतिशय शांत पण आतून कपटी असा खलनायक साकारणे माझ्यासाठी चॅलेंजिंग होते. चित्रपटाच्या कथानकाला वळण देणारी ही भूमिका प्रेक्षकांनाही धडकी भरवणारी आहे. ‘कथेच्या गरजेनुसार भूमिकेत शिरणे माझ्यासाठी नेहमीच आव्हानात्मक असते. अशा भूमिका फार कमी लिहिल्या जातात, दिग्दर्शक समित कक्कड यांच्या ‘रानटी’ चित्रपटामुळे मला ‘सदा राणे’ या खलनायकाच्या व्यक्तिरेखेत प्रवेश करण्याची जबरदस्त संधी मिळाली आणि मी माझ्या पद्धतीने ती पडद्यावर साकारली आहे."
संबंधित बातम्या