मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते म्हणून शरद पोंक्षे ओळखले जातात. ते सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. नुकताच शरद पोंक्षे यांनी मुलासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी मुलगा स्नेह दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करत असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या पोस्टवर अभिनेते विजू मोने यांनी केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
शरद पोंक्षे यांनी मुलासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच स्नेहच्या आगामी चित्रपटाच्या बातम्यांची कात्रणे त्यांनी शेअर केली आहे. हे फोटो शेअर करत त्यांनी 'माझी निर्मिती व माझा मुलगा स्नेहचा दिग्द असलेला पहिला सिनेमा सुरू करतोय. आशिर्वाद असूदेत. आज पर्यंत माझ्या प्रत्येक कलाकृतीवर प्रेम केलत तसेच या सिनेमावरही कराल अशी आशा बाळगतो. स्नेह पोंक्षे लिखीत दिग्दर्शित हा सिनेमा दिवाळी २४ पर्यंत प्रदर्शित करण्याचा प्रयत्न आहे. शिर्षक लवकरच जाहिर करू' असे कॅप्शन दिले आहे. सोशल मीडियावर शरद पोंक्षे यांची पोस्ट व्हायरल झाली असून अनेकांनी स्नेहाला पाठिंबा दर्शवला आहे. पण या पोस्टवर अभिनेते संजय मोने यांनी केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले.
वाचा: भर कार्यक्रमात अक्षय कुमारने दिला अभिनेत्रीच्या ड्रेसवर पाय अन्...; पाहा नेमकं काय झालं
"मी त्यात काम करतो आहे, विनाअट कारण शरदने नथुराम गोडसेचे काम करताना आणि असंख्य अडचणीचा सामना करतांना कुठल्याही तथाकथित रंगकर्मींकडे “मी व्यक्त होतोय, मला उचलून धरा”असं कधीही सांगितलं नाही. थोडक्यात नथुराम गोडसे सादर करताना तो महात्मा गांधींचं वचन अवलंबत होता. “एकला चालो रे!” याहून गंमत काय असणार आहे? व्यक्तिशः मी त्या सगळ्या गोष्टींच्या तत्वांशी सहमत नाही पण ना मी गांधी पाहिले ना मी नथुराम गोडसे पाहिले…त्यामुळे न पाहिलेल्या लोकांच्या बाबतीत काही बोलणे हे गैरलागू आहे.शेवटी शरद पोंक्षे हा माझा मित्र आहे आणि त्याच्या मुलाच्या चित्रपटात काम करणं हे माझ्यासाठी एक मैत्रीबंधन आहे” अशी कमेंट संजय मोने यांनी केली.
संजय मोने यांच्या कमेंटला शरद पोंक्षेंनी उत्तर दिले आहे. “व्वा संजय लव्ह यू यार. किती छान व्यक्त होतोस आणि हे ऋण कधीही न विसरता येणारं,” असे त्यांनी म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर दोघांच्या कमेंटची चर्चा रंगली आहे.